महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gujarat Accident : अपघात पाहण्याकरिता जमलेल्या लोकांना कारने उडविले, पुलावर चिरडून 9 जण ठार - Ahmedabad road accident

अहमदाबादमध्ये भरधाव कारने चिरडल्याने तब्बल 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्कॉन पुलावर कारने डंपरला दिलेली धडक पाहण्यासाठी हे नागरिक जमा झाले होते. मात्र कारच्या अपघातानंतर दुसऱ्या कारने या नागरिकांना चिरडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Gujarat Accident
घटनास्थळ

By

Published : Jul 20, 2023, 8:53 AM IST

Updated : Jul 20, 2023, 9:32 AM IST

अहमदाबाद : जीपने डंपरला दिलेली धडक पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीला दुसऱ्या भरधाव कारने चिरडल्याने 9 नागरिकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या अपघातात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. ही भरधाव कार तब्बल 160 च्या वेगाने धावत होती. हा अपघात अहमदाबादच्या इस्कॉन पुलावर बुधवारी रात्री उशीरा घडला आहे. तात्या पटेल असे या अपघातातील कार चालकाचे नाव आहे. या अपघातात एका पोलीस जवानासह एका होमगार्डचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या अपघातातील जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर सोला सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जीप आणि डंपरचा अपघात :अहमदाबाद एसजी रोडवर असलेल्या इस्कॉन पुलावर भरधाव जीपचा आणि डंपरचा अपघात झाला. यावेळी हा अपघात पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली होती. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या कारने या गर्दीला चिरडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सहा नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोला सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रोडवर मृतदेहाचा खच :इस्कॉन पुलावर जीपने डंपरला धडक दिली होती. यावेळी घटनास्थळावर अपघात पाहण्यासाठी 50 ते 60 नागरिकांची गर्दी जमली होती. अपघात झाल्याने घटनास्थळावर पोलिसांनीही धाव घेतली होती. मात्र याच वेळी भरधाव कारने या गर्दीला चिरडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात घटनास्थळावर आलेल्या पोलीस दलातील जवानासह एका होमगार्डचाही मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर पूर्ण पुलावर मृतदेहाचा खच पडला होता. हे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते.

या नागरिकांचा झाला अपघातात मृत्यू :या अपघातात मृत झालेल्या 7 जणांची नावे समोर आली आहेत. यात अक्षय चावडा (बोताड), कृणाल कोडिया (बोताड), अमन काच्छी (सुरेंद्रनगर), अरमान वडवानिया (सुरेंद्रनगर), नीरव (आमदा), पोलीस जवान धर्मेंद्र सिंग (अहमदाबाद) यांचा समावेश आहे. अपघाताला कारणीभूत असलेल्या कारच्या चालकासह 15 हून अधिक जणांना गंभीर जखमी अवस्थेत सोला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. धडक देणाऱ्या कारमध्ये एका मुलीसह 4 जण प्रवास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील मिजान शेख आणि नारण गुर्जर यांना उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

जीप डंपरला धडकले, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार :इस्कॉन पुलावर उभ्या असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, प्रथम एक जीप डंपरला धडकली. हा अपघात पाहण्यासाठी इतरही नागरिक जमा झाले. कार चालकाने उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले. यामध्ये नागरिक 25 फुटांपर्यंत चिरडले गेले. जखमी नागरिकांना रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सेक्टर 1 जेसीपी नीरजकुमार बडगुजर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू : रात्री उशिरा घटनेच्या वेळी घटनास्थळी पोहोचलेले वाहतूक एसीपी एसजे मोदी यांनी सांगितले की, रात्री एक वाजण्याच्या सुमारास इस्कॉन ब्रिजवर एक जीप डंपरला धडकली. दरम्यान, दुसरी एक कार भरधाव वेगाने आल्याने त्या कारने चिरडल्याने गर्दीतील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत एसजी 2 ट्रॅफिकच्या एका पोलिसाचाही मृत्यू झाला आहे. जखमी आणि मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील बहुतांश विद्यार्थी असून ते बोताडहून अहमदाबादला अभ्यासासाठी आल्याचे समजते. कारचा चालक जखमी झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.

Last Updated : Jul 20, 2023, 9:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details