महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

2500 कोटी रुपयांचे हेरॉईन प्रकरण; गुजरात एटीएसकडून आरोपीला बेड्या - गुजरात एटीएस

शाहीद सुमरा हा आरोपी कच्छमधील मांडवी शहराचा रहिवासी आहे. तो नॅक्रो-टेररिझममध्ये गुंतल्याचा गुजरात एटीएस पोलिसांनी दावा केला आहे.

Guj ATS
Guj ATS

By

Published : Jul 29, 2021, 9:17 PM IST

अहमदाबाद- गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने 2,500 कोटी रुपयांच्या हेरॉईन प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. कसम सुमरा (35) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने 530 किलोची हेरॉईन जप्त केले होते. हे हेरॉईन समुद्रमार्गे पाकिस्तानमधून आणण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला होता. जप्त केलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात 2,500 कोटी रुपये किंमत आहे. या प्रकरणातील आरोपीला गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. शाहीद सुमरा हा आरोपी कच्छमधील मांडवी शहराचा रहिवासी आहे. तो नॅक्रो-टेररिझममध्ये गुंतल्याचा गुजरात एटीएस पोलिसांनी दावा केला आहे. या माध्यमातून दहशतवाद्यांना पैसा पुरविला जात असल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे.

हेही वाचा-राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत जाणाऱ्या रायफल शूटरवर काळाचा घाला; कार अपघातात मृत्यू

दहशतवाद विरोधी पथकाने आरोपीला दिल्लीच्या विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. यापूर्वी त्याच्यावर 2018 आणि 2021 मध्ये गुजरात आणि पंजाबमध्ये गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था ही गुजरातच्या एटीएसबरोबर अधिक तपास करणार आहे.

हेही वाचा-दिल्ली: ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट

काय आहे प्रकरण?

हेरॉईनची तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 10 जुलै 2021 रोजी पर्दाफाश केला. स्पेशल सेलने टोळीमधील चार आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी ३५० किलो हेरॉईन जप्त केली आहे. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात २५०० कोटी किंमत असल्याचे सांगितले जात आहे. स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाहा म्हणाले, की गुप्त माहितीनुसार चार आरोपींना अटक केली आहे. पोलीस तस्करीचे पाळेमुळे शोधत आहोत. तस्करीतील नेटवर्कशी संबंधित लोकांची चौकशी करण्यात येत आहे. आरोपी दिल्लीमध्ये केव्हापासून तस्करी करत आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अटकेतील आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आरोपींचे तस्करीचे जाळे कुठवर आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details