महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gudipadwa 2023 : मराठी नववर्षाची होते गुढीपाडव्याला सुरुवात, जाणून घ्या काय आहे महत्व - हिंदू पंचांग

चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी सकाळीच आपल्या घरावर गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत करण्यात येते.

Gudi Padawa 2023
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 21, 2023, 1:18 PM IST

Updated : Mar 22, 2023, 6:50 AM IST

हैदराबाद : चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढी पाडवा साजरा करण्यात येतो. या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात करण्यात येते. हिंदू पंचांगानुसार मराठी नागरिक आपल्या नववर्षाची सुरुवात करतात. या दिवशी घरावर गुढ्या उभारुन नववर्षाचे स्वागत करण्यात येते. त्यामुळे गुढी पाडव्याच्या सणाची मराठी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येते.

गुढी पाडव्याचे महत्व :महाराष्ट्रातील मराठी बांधव या दिवशी आपल्या नवीन कामाला सुरुवात करतात. त्यासह अनेक जण नवीन वाहनांची खरेदी करतात. गुढी पाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला अनन्य साधारण महत्व असल्याचे दिसून येते. या दिवशी ब्रह्म मुहुर्तावर सुर्याची पूजा केल्याने सगळ्या पापांचा नाश होत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे गुढी पाडव्याला सकाळीच उठून सुर्याची विधिवत पूजा करण्यात येते. साडेतीन मुहुर्तापैकी गुढी पाडवा हे एक मुहूर्त असल्यामुळे पाडव्याचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो.

काय आहे अख्यायीका :हिंदू दिनदर्शीके प्रमाणे शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस म्हणून गुढी पाडव्याचा दिवस गणला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केल्याची अख्यायीका प्रसिद्ध आहे. त्यामुळे या दिवशी गुढी उभारून उत्सव साजरा करण्यात येत असल्याची अख्यायीका सांगितली जाते. दुसरीकडे प्रभू श्रीरामांनी चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला होता. त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्येतील नागरिकांनी आपल्या घरावर गुढी उभारुन त्यांचे स्वागत केल्याची अख्यायीकाही सांगितली जाते.

कशी बांधावी गुढी :गुढी पाडव्याला घरावर गुढी उभारण्यात येते. ही गुढी एकाद्या काठीला बांधून उभारली जाते. यावेळी काठीला तांब्याचा कलश, त्याला नवीन वस्त्र गुंडाळण्यात येते. त्यासह त्यावर कडूनिंबाचा पाला, साखर गाठ्याचा प्रसाद आदी सगळे मिळून ही गुढी घरासमोर उभारली जावी. गुढी उभारताना तिचे तोंड आपल्या घराकडे करावे. गुढीला हळदी कुंकू वाहून, पुरण पोळीचा नेवैद्य देण्यात येतो.

Disclaimer : उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर हे वृत्त देण्यात आलेले आहे. त्याबाबत ईटीव्ही भारत कोणतीही पुष्टी करत नाही. ईटीव्ही भारत मराठी कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही, किवा अंधश्रद्धा पसरनतही नाही. ही माहिती

हेही वाचा - World Forest Day 2023 : वृक्षवल्ली आम्हा सोयरे, पण तरी होते दरवर्षी 'इतक्या' वृक्षाची कत्तल

Last Updated : Mar 22, 2023, 6:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details