महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अर्थव्यवस्थेला दिलासा! जानेवारीत विक्रमी जीएसटी संकलन! - अर्थव्यवस्था

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात विक्रमी 1.20 लाख कोटी इतके जीएसटी संकलन करण्यात आले. जीएसटीच्या बनावट पावत्यांच्या आधारे कर चुकवेगिरीविरोधात देशव्यापी मोहिम राबविली जात आहे.

अर्थव्यवस्थेला दिलासा! जानेवारीत विक्रमी जीएसटी संकलन!
अर्थव्यवस्थेला दिलासा! जानेवारीत विक्रमी जीएसटी संकलन!

By

Published : Feb 1, 2021, 7:23 AM IST

नवी दिल्ली : कोरोनामुळे जबरदस्त फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेसाठी नव्या वर्षाचा पहिला महिना दिलासादायक ठरला आहे. 2021 च्या जानेवारीत जीएसटी संकलन 1 लाख 20 हजार कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. अर्थसंकल्प सादर होत असताना आलेली ही आकडेवारी सरकारसाठी दिलासायादक असल्याचे बोलले जात आहे.

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात 1,19,847 कोटींचे जीएसटी संकलन करण्यात आले. यात सीजीएसटीचा वाटा 29,923 कोटी, एसजीएसटीचा वाटा 29,014 कोटी, तर आयजीएसटीचा वाटा 60,0288 कोटी इतका आहे.

आयजीएसटीपैकी 27,424 कोटींचे संकलन आयात वस्तुंवरील करातून झाले आहे. उपकरातून 8622 कोटींचे संकलन झाले आहे.

आयजीएसटीच्या नियमित निपटाऱ्यातून सीजीएसटीत 24,531 कोटी तर एसजीएसटीत 19,371 कोटी देण्यात आले आहेत. यातून केंद्राला 46,454 कोटी तर राज्यांना 48,385 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

यंदाच्या जानेवारीतील जीएसटी कलेक्शन हे गेल्या वर्षीच्या जानेवारीपेक्षा 8 टक्क्यांनी जास्त आहे.

कर चुकवेगिरीविरोधात कठोर पावले

जीएसटीच्या बनावट पावत्यांच्या आधारे कर चुकवेगिरीविरोधात कठोर पावले उचलल्याने जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. याासठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत यंत्रणांकडून घेतली जात आहे. जीएसटीच्या बनावट पावत्यांच्या वापराविरोधात देशव्यापी मोहिम राबविली जात आहे.

हेही वाचा -जाणून घ्या, देशाच्या अर्थसंकल्पासमोरील आव्हाने

ABOUT THE AUTHOR

...view details