महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Granade Recovered : एनएसजीची मोठी कारवाई.. दिल्लीत ग्रेनेड जप्त.. कारवाईसाठी गेल्यावर गोळीबार २ जखमी, १ अटकेत - दिल्लीत ग्रेनेड जप्त

एनएसजीच्या पथकाने दिल्लीत मोठी कारवाई करत ग्रेनेड जप्त केले आहेत. हे ग्रेनेड नंतर निकामी करण्यात आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी यमुना खादर परिसरात शोध मोहीम राबवली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी जवानांवर गोळीबार करणाऱ्या ४ ते ५ जणांना ताब्यात घेतले.

Granade Recovered
दिल्लीत ग्रेनेड जप्त

By

Published : Jun 12, 2022, 11:36 AM IST

नवी दिल्ली: शनिवारी मयूर विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यमुना खडेर परिसरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) पथकाने एक ग्रेनेड जप्त करून ( Grenade recovered in Delhi ) निकामी ( Grenade defused by NSG ) केला. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) मध्ये त्याची तपासणी करण्यात येत असल्याचे दिल्ली पोलिसांनी ( FSL examination by Delhi Police ) सांगितले.

एनएसजीने ग्रेनेड जप्त केल्यानंतर खबरदारी म्हणून दिल्ली पोलिसांनी यमुना खादर परिसरात शोध मोहीम राबवली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. एका गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी एनएसजी जवानांवर गोळीबार करणाऱ्या ४ ते ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

"यमुना खादर परिसरात काल रात्री शोध मोहिमेदरम्यान, पोलिसांवर गोळीबार केल्याने दोन जण जखमी झाले. या कारवाईदरम्यान एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे," असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून एक 9 एमएम पिस्तूल, 2 जिवंत राउंड आणि एक सीएमपी, 2 जिवंत राउंड जप्त करण्यात आले आहेत.

याशिवाय एकूण 25 संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. यमुना खादर परिसरात दरोडेखोर असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून कलम 186/353/307/34 आयपीसी आणि 27 शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : प्रयागराज : शिवलिंगावर ठेवले अंडे, वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details