नवी दिल्ली -देशात लसीकरणाचा वेग वाढविण्याकरिता दिलासादायक बातमी आहे. भारत बायोटेकच्या अंकलेश्वरमधील उत्पादन प्रकल्पाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या उत्पादन प्रकल्पामधून कोरोना लशीचे उत्पादन घेतले जाणार आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून भारत बायोटेकच्या उत्पादन प्रकल्पाला मंजुरी दिल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की भारत बायोटेकच्या अंकलेश्वर उत्पादनाला मंजुरी दिल्याने कोरोना लशीचे देशातील प्रमाण वाढणार आहे.
हेही वाचा-जातींसंदर्भात माहिती जाहीर करण्याचा प्रस्ताव नाही, सरकारची लोकसभेत माहिती
पंतप्रधानांच्या व्हिजनप्रमाणे लशींची उपलब्धतता वाढणार आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. मनसुख मांडवी यांच्याकडे केमिकल्स आणि फर्टिलायझर्स या दोन्ही विभागांचे मंत्रीपद आहे. भारत बायोटेकने मे महिन्यात अतिरिक्त 200 दशलक्ष डोसचे उत्पादन वाढविण्याची घोषणा केली होती.
हेही वाचा-"आम्ही धान लावतो, तुम्ही लस घ्या" शेतकऱ्यांनी लस घ्यावी म्हणून शिक्षकांनी केले शेतात काम!