महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gold Silver Price Today : अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंधेला सोनं-चांदी स्वस्त; वाचा आजचे दर

तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे. परंतु, खरेदीसाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी मौल्यवान धातूंच्या आजच्या किंमती जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सोमवारी (दि. 2 मे)रोजी एमसीएक्सवर (MCX)सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 1.08 टक्क्यांनी घसरून 51,195 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा दर 1.63 टक्क्यांनी घसरून 63,301 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत.

Gold Silver Price Today
Gold Silver Price Today

By

Published : May 2, 2022, 10:49 AM IST

मुंबई -तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे. परंतु, खरेदीसाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी मौल्यवान धातूंच्या आजच्या किंमती जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सोमवारी (दि. 2 मे)रोजी एमसीएक्सवर (MCX)सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 1.08 टक्क्यांनी घसरून 51,195 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा दर 1.63 टक्क्यांनी घसरून 63,301 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठीआयएसओ (Indian Standards Organization)द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्कचिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

हेही वाचा -Raj Thackeray on loudspeaker : भोंग्यांचा प्रश्न धार्मिक नही तर सामाजिक - राज ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details