महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gold Silver Rate Today: आज सोने चांदीचे भाव वधारले, जाणून घ्या आजचे दर - gold and silver Rate rose

नववर्षाच्या सुरुवातीपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार होत आहेत. कालपेक्षा सोने चांदीच्या दर आज किंचीत वधारले आहेत. आज सोन्या चांदीचे दर काय आहेत, हे सविस्तरपणे जाणून घेवू या.

Gold Silver Rate Today
सोन्या चांदीचा आजचा दर

By

Published : Jan 29, 2023, 7:32 AM IST

मुंबई:आर्थिक मंदीचे सावट आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची स्थिती अत्यंत नकारात्मक आहे. या आठवड्यात मंगळवारी इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान सोन्याचा भाव 57,125 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. अशा परिस्थितीत भारतात बजेटआधी मात्र सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र अजूनही सोन्याचे दर 56 हजारापेक्षा कमी आहेत. बुधवारी संध्याकाळच्या व्यवहारानंतर जबरदस्त सुधारणा झाली. मात्र तरीही सोने गेल्या ४ दिवसांपासून तेजी कायम ठेवू शकलेले नाही. शुक्रवारी ७ रुपयांच्या किरकोळ घसरणीसह बंद झाले होते. गुरुवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सोने आणि चांदीचे बाजार बंद होते.

सोन्या चांदीचा आजचा दर

सराफा बाजारात सोन्याचा भाव:या आठवड्यात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याचे दर आज 29 जानेवारीला किंचीत वधारले आहेत. वायदा बाजारातील घसरणी बरोबरच सराफा बाजारातही सोने स्वस्त झाले आहे. वायदा बाजारात या आठवड्याच्या सुरुवातीला सोने ५७,००० च्या वर पोहोचले होते. सोने याच पातळीवर व्यवहार करत होते, पण आज त्यात घसरण झाली. आज वायदा बाजारात वायदा सोने चांदी घसरणीसह उघडले आहे.

सोन्याचे आजचे दर:24 कॅरेट 8 ग्रॅम सोन्याच्या भावात 504 रुपयांनी घसरण झाली आहे. तर 22 कॅरेट आणि 25 कॅरेटच्या एक आणि आठ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे पाहु या. 22 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,265, 8 ग्रॅम ₹42,120, 10 ग्रॅम ₹52,650, 100 ग्रॅम ₹5,26,500 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,744, 8 ग्रॅम ₹44,904, 10 ग्रॅम ₹57,440, 100 ग्रॅम ₹5,74,400 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,500, मुंबईत ₹52,650, दिल्लीत ₹52,800, कोलकाता ₹52,650, हैदराबाद ₹52,650 आहेत.

चांदीचे आजचे दर:चांदीच्या भावाचे बोलायचे झाले तर यामध्येही घसरण झाली आहे. 28 जानेवारी रोजी बाजारात चांदीच्या भावात 400 रुपयांनी घसरण झाली आहे. यानुसार आता 1 ग्रॅम चांदीची किंमत 74.6 रुपये तर एक किलो चांदीचा भाव 74600 रुपये इतका झाला आहे.कालपेक्षा आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे.आज चांदी 1 ग्रॅम ₹72, 8 ग्रॅम ₹577, 10 ग्रॅम ₹722, 100 ग्रॅम ₹7,220, 1 किलो ₹72,200 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹742, मुंबईत ₹722, दिल्लीत ₹722, कोलकाता ₹722, बंगळुरू ₹742, हैद्राबाद ₹742 आहेत.

हेही वाचा: Women Stole Gold Ear Rings महिला चोरांनी सोन्याच्या झुमक्यावर केला हात साफ, घटना सीसीटीव्हीत कैद

ABOUT THE AUTHOR

...view details