पुरी - ओडिशामधील पुरीतील भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या अधरपणा (adharpana) विधीनंतर आज उत्सवमूर्ती श्रीमंदिरात प्रवेश करतील. या विधीला 'निलाद्री बिजे' (niladri bije) असे म्हटले जाते. हा विधी प्रसिद्ध रथयात्रेचा (rathyatra) अंतिम विधी असतो. शुक्रवार सायंकाळी तिन्ही देव श्रीमंदिरात प्रवेश करण्याचा विधी सुरू झाला आहे. यानंतर तिन्ही भगवान आपल्या रत्नजडित सिंहासनावर विराजमान होतील.
या विधीनुसार 'गोटी पहंडी' च्या माध्यमातून एक-एक करून मूर्तींना रथातून बाहेर काढून मंदिरात प्रवेश केला जाईल. पहिल्यांदा भगवान बलभद्र व त्यानंतर देवी सुभद्रा यांना मंदिरात आणले जाईल. तर भगवान श्री जगन्नाथ यांना मंदिरात आणण्याआधी आणखी एक विधी केला जाईल.