गोवा (पणजी) -पर्यटनासाठी जगाच्या नकाशावर गोव्याची ओळख आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना येथील संस्कृती भुरळ घालते. येथील संगीत, नृत्य, गाणी ही येथील संस्कृतीची मूलभूत अंगे आहेत. येथील नृत्य, नृत्यांगना यांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणाऱ्या गोवन बँडची ही वेगळी ओळख आहे.
काय आहे गोवन बँड? (Goan Band)
सेक्साफोन, ड्रम पॅड व ढोलच्या साहाय्याने साधारण 10 ते 15 लोक एक विशिष्ट सूर लावून ही वाद्य वाजवीत असतात. लयबद्ध पध्दतीने वाजवल्या जाणाऱ्या शब्दसुरांच्या आवाजामुळे एक सुमधुर धून तयार होते. विशेषतः लग्न सोहळे, मान्यवरांचे स्वागत, तसेच मोठमोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात गोवन बँड वाजवला जातो. गोवन बँड वाजवणाऱ्या कलाकारांचे कपडेही गोव्याच्या नैसर्गिक रंगाप्रमाणे रंगीबेरंगी असतात. रंगीबेरंगी शर्ट आणि पॅन्ट तसेच डोक्यावर काळी टोपी हा मुख्य पोशाख असतो या बँड वाजवणाऱ्या वक्तींचा.
बँड ही गोव्यातील सांस्कृतिक ओळख