महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IPS Officer A Kon Suspend : आयपीएस ए कोआन यांचे थेट गृहमंत्रालयाकडून निलंबन, गोव्याच्या पार्टीतील 'ते' कृत्य भोवले! - तरुणीची छेडछाड

गोवा पोलीस दलात पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला ( Deputy Inspector General Of Police ) तरुणीसोबत नाईट क्लबमध्ये छेडछाड केल्याने चांगलेच भोवले आहे. या अधिकाऱ्याचे गृहमंत्रालयाने निलंबन केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 17, 2023, 8:30 AM IST

पणजी :समुद्र किनाऱ्यावरील नाईट क्लबमध्ये पार्टी करताना तरुणीचा आयपीएस अधिकाऱ्याने विनयभंग केल्याची सोमवारी रात्री घडल्यानंतर गोवा विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्रालयात तक्रार केली. त्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉ. ए. कोआन असे त्या गृहमंत्रालयाने निलंबित केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. ए कोआन हे गोव्यात पोलीस उपमहानिरिक्षक दर्जाच्या पदावर कार्यरत आहेत.

कलंगुटच्या नाईटक्लबमध्ये घडला प्रकार :दिल्ली येथील तरुणी फिरण्यासाठी गोवा येथे गेली होती. तर गोवा पोलीस दलात डीआयजी रँकवर कार्यरत असलेले डॉ. ए. कोआन यांनीही मौजमजा करण्यासाठी या नाईटक्लबमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ए. कोआन यांनी तरुणीची छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या तरुणीने ए. कोआन यांच्यासोबत वाद घातला. या वादाचा कथित व्हिडिओ सोशल माध्यमांवर आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

गोवा विधानसभेत गाजला मुद्दा :सध्या गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात गोवा पॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि भाजपाचे मायकल लोबो यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा सदनात उपस्थित केला. ए. कोआन या डीआयजी पदावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने पर्यटक महिलेची छेडछाड केल्याचा आरोप त्यांनी सदनात केला. त्यामुळे गोवा विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली गृह मंत्रालयात तक्रार :गोवा विधानसभेत तरुणीच्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या तक्रारीनंतर गृह मंत्रालयाने तात्काळ कारवाई करत ए कोआन यांना निलंबित केले आहे. त्यांना निलंबित करुन त्यांना गोवा पोलीस मुख्यालयात हजेरी लावण्यास सांगण्यात आल्याची माहितीही प्रमोद सावंत यांनी दिली आहे. पुढील आदेशापर्यंत गोवा पोलीस मुख्यालय सोडण्यास त्यांना मनाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Molestation Minor Girl : प्रसाद आणण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी पाच दिवसापासून फरार

ABOUT THE AUTHOR

...view details