पणजी -राज्याच्या राजकारणात दयानंद सोपटे विरुद्ध माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हा वाद तसा जुनाच, मात्र सोमवारी दोन्ही नेत्यांनी पक्ष श्रेष्टीसमोर आपापल्या समर्थकांसह कार्यक्रमात शक्तिप्रदर्शन केले. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आरलेकर यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक ( Union Minister Shripad Naik ), मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( CM Dr. Pramod Sawant ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र हा सोहळा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आयोजित केल्याचे बोलले जात होते. याचाच भाग म्हणून पार्सेकरांनी आपल्या समर्थकांसह जय्यत तयारी केली होती.
- सोपटेचं शक्तिप्रदर्शन आणि सरशीही -
आपल्याच मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि राजकीय विरोधक अशाप्रकारे सोहळा आयोजित करतात आणि त्याला केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर आमदार दयानंद सोपटेनिही ( MLA Dayanand Sopte ) राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केली. पार्सेकरांना प्रतिउत्तर देण्यासाठी त्यांनी चक्क अल्पावधीतच कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. आणि या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री सावंत यांच्यासह राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले होते. यावेळी सोपटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपणच येथील भावी आमदार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. यावेळी फडणवीस यांनी सोपटेनच्या कामाचे कौतुक केले.
- राज्यात सध्या सायबेरीयन जातीचे पक्षी येतात- फडणवीस
राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलीये, त्यामुळे हंगामात ज्या पद्धतीने सायबेरीयन पक्षी भारतात येतात आणि पुन्हा परत जातात तसेच काही राजकीय पक्ष दिल्ली आणि पश्चिम बंगालमधून गोव्यात निवडणुकीच्या हंगामात दाखल झाले आहेत, मात्र ते पराजितच होऊन परत जाणार असल्याचे राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले व त्यांनी आपल्या भाषणात नेतृत्वहीन असणाऱ्या काँग्रेस व राहुल गांधी यांचा समाचारही घेतला.
- विरोधक मला संपविण्यासाठी एकत्र आले -