महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Goa Assembly Elections 2022 : आमदार कारलूस आलमेदा यांचा आमदारकीचा राजीनामा, गोव्यात भाजपला दुसरा धक्का - Goa BJP MLA Carlos Almeida

वास्को मतदारसंघाचे आमदार कारलूस आलमेदा यांनी पक्षाच्या ध्येधोरणांना कंटाळून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. (Goa BJP MLA Carlos Almeida Resigns) आलमेदा हे मागच्या दोनवेळा भाजपकडून वास्को मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, मागच्या काही दिवसापासून भाजपच्या पक्षीय कारणांपासून त्यांना डावलण्यात येत होते. (Goa Assembly Elections 2022) त्यामुळे आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले

आमदार कारलूस आलमेदा
आमदार कारलूस आलमेदा

By

Published : Dec 22, 2021, 10:37 AM IST

गोवा (पणजी) - भाजप आमदार कारलूस आलमेदा यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर आलमेदा यांनी राजीनामा दिल्याने (Carlos Almeida Resigns )भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Goa Assembly Elections 2022) भाजपने मागच्या काही महिन्यात पक्षीय कार्यात डावल्याच्या कारणावरून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे अशी माहिती समोर आली आहे.

भाजप आमदार प्रतिक्रिया देताना

भाजपला दुसरा धक्का

वास्को मतदारसंघाचे आमदार कारलूस आलमेदा यांनी पक्षाच्या ध्येधोरणांना कंटाळून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आलमेदा हे मागच्या दोनवेळा भाजपकडून वास्को मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, मागच्या काही दिवसापासून भाजपच्या पक्षीय कारणांपासून त्यांना डावलण्यात येत होते. त्यामुळे आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले

सलढाणा यांचाही राजीनामा

या आधी वास्कोच्या नजीकच्या कोर्टालीम मतदारसंघतील आमदार एलिना सलढणा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्या आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, भाजपने सध्या नव्या चेहऱ्यांना संधी द्यायचे ठरवले आहे. म्हणूनच निवडून न येऊ शकणाऱ्या आमदारांच्या जागी त्यांनी विरोधी पक्षातील व अपक्ष आमदारांना पक्षात घ्यायचा सिलसिला चालू केला आहे.

अंतर्गत त्रासाला कंटाळून एलिना सलढणा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला

गोव्यातील भाजपाच्या आमदार एलिना सलढणा ( BJP MLA Alina Saldanha ) यांनी गुरुवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा ( Alina Saldanha Resigned ) देऊन रात्री उशिरा दिल्लीत जाऊन आम आदमी पक्षात प्रवेश ( Alina Saldanha Joined the Aam Aadmi Party ) केला. पक्षाच्या अंतर्गत त्रासाला कंटाळून एलिना सलढणा यांनी आमदारकीचा राजीनामा गुरुवारी सकाळी विधानसभा सभापती राजेश पाटनेकर यांच्याकडे सुपुर्द केला होता. त्या कोर्टालीम मतदारसंघाच्या ( Cortalim Goa Assembly Constituency ) आमदार होत्या.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकिटावरून धुसफूस सुरू होती

एलिना सलढणा या मागील काही दिवसांपासून पक्षीय नेतृत्वावर नाराज होत्या. त्यांच्याच तालुक्यातील भाजपाचे बडे नेते आणि राज्याचे वाहतूक आणि पंचायत मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो यांच्याकडून त्यांचे पंख छाटण्याचे काम सुरू होते. एलिना सलढणा आणि म्हाव्हीन गुडीन्हो यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकिटावरून धुसफूस सुरू होती. अखेर या त्रासाला कंटाळून सलढणा यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला. पक्षाच्या त्रासाला व गोव्यात चाललेल्या राजकीय परिस्थितीमुळे मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

आप मध्ये प्रवेश -

दरम्यान आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेत त्यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत राज्यातील पक्षाचे नेते राहुल म्हाम्बरे व वाल्मिकी नायक उपस्थित होते.

हेही वाचा -मुलींच्या लग्नाचं वय 21 झालं! पहा ईटीव्ही भारत'चा आदिवासी बांधवांसोबचा हा खास रिपोर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details