पणजी - राज्यात सागरमाला व रेल्वे दुपदरीकरणाच्या माध्यमातून कोळसा वाहतुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे रेल्वेची दुपदरीकरण, महामार्ग ( Highway ) विस्तार व तामनार वीज प्रकल्प हा थ्रीलिनियेर प्रोजेक्ट ( three linear projects ) रद्द करावा, या मागणीसाठी काँग्रेसने सभागृहात ( Congress Hall ) गोंधळ घालत पावसाळी अधिवेशनाचे ( Monsoon session ) कामकाज बंद पाडले आहे. दरम्यान विरोधकांनी कोळसा नको, अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला आहे.
कोळसा वाहतुकीला चालना मिळणार - दरम्यान विरोधकांना सभागृहात चर्चा करायची नाही, म्हणून ते गोंधळ घालतात. तसेच त्यांना सभागृहाचे कामकाज सुरळीत करायचे नाही, म्हणून या सर्व गोष्टी करत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Chief Minister Pramod Sawant ) यांनी सांगितले. राज्यात सागरमाला व रेल्वे दुपदरीकरणाच्या माध्यमातून कोळसा वाहतुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे रेल्वेची दुपदरीकरण, महामार्ग ( Highway ) विस्तार व तामनार वीज प्रकल्प हा थ्रीलिनियेर प्रोजेक्ट रद्द करावा, या मागणीसाठी काँग्रेसने सभागृहात गोंधळ घालत पावसाळी अधिवेशनाचे कामकाज बंद पडले आहे. दरम्यान विरोधकांनी कोळसा नको, अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला आहे.
थ्री लिनियस प्रोजेक्टला विरोधकांनी विरोध दर्शवत अधिवेशनाचे कामकाज बंद - अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी कोळसा नको, तसेच केंद्र सरकारने येऊ घातलेल्या थ्री लिनियस प्रोजेक्टला विरोधकांनी विरोध दर्शवत अधिवेशनाचे कामकाज बंद पडले आहे. यावेळी त्यांनी कोळसा नको, अशा घोषणा देत सभागृहात सरकारला धारेवरती धरले. मात्र, विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित करत विरोधकांची मागणी फेटाळून लावली आहे.