हिंदू धर्मात श्रीमद भगवदत गीता (Gita Jayanti 2022) हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. पुराणात अशी मान्यता आहे की, गीता ही भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघाली आहे. या ग्रंथाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील (importance date significance) एकादशी ही गीता जयंती म्हणून साजरी केली (shubh muhurat and puja vidhi) जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून गीतेची शिकवण दिली असे मानले जाते.
धर्मज्ञानाचा कोष : समग्र महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गीतेत दिले आहे. गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा मान मिळाला आहे. गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायः प्रत्येक विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे.
जीवनाचा पुरुषार्थ :हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी, साधू, संत, भक्त, चिंतक, योगी, कर्मवीर, ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील, भूप्रदेशातील, काळातील असो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्या सर्वांना गीतेतील अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे.