महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

GF Killed BF By Snake : पहिल्या बॉयफ्रेंडला संपवण्यासाठी गर्लफ्रेंडने सापाला घेतले सोबत; 'असा' काढला काटा - गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा काढला काटा

गर्लफ्रेंडने आपल्या पहिल्या बॉयफ्रेंडला संपवण्यासाठी सापाला सोबत घेऊन कट रचल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्लफ्रेंडने आपल्या दुसऱ्या बॉयफ्रेंडसह एका गारुड्यालाही या कटात सहभागी करुन घेतले होते. हा धक्कादायक प्रकार उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील हलद्वानीमध्ये घडला आहे.

snake
snake

By

Published : Jul 19, 2023, 4:13 PM IST

प्रतिक्रिया देताना पोलीस

उत्तराखंड(नैनीताल) -दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबतच्या रिलेशनसाठी पहिला बॉयफ्रेंड अडचणीचा ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा कट गर्लफ्रेंडने रचला होता. यात तिने शक्कल लढवत एका गारुड्यालाही सहभागी करुन घेतले होते. यात सापाने चावा घेतल्याने बॉयफ्रेंडचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस तपासात हा सर्व प्रकार समोर आला आहे.

व्यावसायिकाच्या मुलाचा गेला जीव - हे संपूर्ण प्रकरण हल्द्वानी येथील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या मुलाच्या मृत्यूशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 जुलै रोजी रामपूर रोड रामबाग येथील रहिवासी 32 वर्षीय अंकित चौहान याचा मृतदेह हलद्वानी येथील तीन पानी बायपास येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीत आढळून आला होता. गाडीत दम कोंडून मृत्यू झाल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना आला होता. मात्र, ही हत्या असल्याचा संशय अंकितच्या कुटुंबियांना होता.

अंकितला सापाने घेतला चावा - अंकितच्या दोन्ही पायावर सर्पदंशाच्या खुणा आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. अंकित चौहानला विषारी सापाने चावा घेतल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झाले होते. कुटुंबियांनीही खुनाचा आरोप केला होता. अंकित चौहानच्या मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट आता समोर आला आहे. त्यानंतर मृताची बहीण ईशा चौहान हिने खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पहिला बॉयफ्रेंड ठरला अडथळा - ईशा चौहानने पोलिसांना सांगितले की, १४ जुलै रोजी तिचा भाऊ अंकित हा लहान भावाला सांगून माही आणि दीप कंदपाल यांना भेटायला गेला होता, त्यानंतर तो घरी परतलाच नाही आणि 15 जुलैला त्याचा मृतदेह कारमध्ये सापडला. माही ही अंकितची गर्लफ्रेंड होती. तर दीप हा माहीचा दुसरा बॉयफ्रेंड होता अशी माहिती मिळाली आहे.

गर्लफ्रेंडचा विषारी कट - गर्लफ्रेंड माही आणि तिचा दुसरा बॉयफ्रेंड दीप यांनी अंकितला संपवण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी एका गारुड्याची मदत घेतली. माहीने अंकितला तिच्या घरी बोलावले होते. अंकित हा घरी आला होता. त्याचवेळी घरात विषारी साप ठेवण्यात आला होता आणि हे अंकितला माहिती नव्हते. त्यामुळे अंकित घरात येताच त्याला मागून येऊन सापाने चावा घेतला. यानंतर अंकितचा जागीच मृत्यू झाला होता. हे प्रकरण उघड होऊ नये म्हणून माही आणि दीपने अंकितचा मृतदेह त्याच्याच गाडीत टाकून एसी सुरु करुन ठेवला होता.

गर्लफ्रेंड दुसऱ्या बॉयफ्रेंडसह फरार - प्रकणाचा तपास लावण्यास पोलिसांना यश आले आहे. यातील गारुड्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर आरोपी गर्लफ्रेंड माही आणि तिचा दुसरा बॉयफ्रेंड दीप हे सध्या फरार असून, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केले आहेत.

हेही वाचा -Drunken Girls Drama On Road : दारु पिऊन तरुणींचा भररस्त्यात धुडगूस; पोलिसाचा मोबाईल फोडला, शिवीगाळही केली, पहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details