महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ऑपरेशन थिएटरमध्ये 'ती' वाजवत राहिली पियानो, अन् डॉक्टरांनी केली मेंदूची सर्जरी

ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन होत असताना चक्क एका तरुणीने पियाने वाजवलं आहे. डॉक्टारांचा ऑपरेशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ग्वाल्हेर
ग्वाल्हेर

By

Published : Dec 13, 2020, 1:15 PM IST

नवी दिल्ली -मेंदूच्या, डोक्याच्या आजारांबद्दल आपण कमी जागरूक असतो. यातील सर्वात गंभीर आजार म्हणजे ब्रेन ट्यूमर. मात्र ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन म्हटलं. अंगावर काटा येतो. ऑपरेशनदरम्यान आपल्याला शुद्धही नसते. मात्र, ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन होत असताना चक्क एका मुलीने पियाने वाजवलं आहे. डॉक्टारांचा ऑपरेशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन होत असताना मुलीने वाजवला पियाने

तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडली असून सौम्या असे मुलीने नाव आहे. शहरातील बिरला रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी अनोखे ऑपरेशन केले आहे. ऑपरेशन थेटरमध्ये ट्युमरचं ऑपरेशन सुरू असताना डॉक्टारांनी सौम्याला बेशुद्ध केले नाही. त्यांनी फक्त डोक्याचा थोडा भाग सुन्न केला होता. त्यामुळे तिला त्रास जाणवला नाही आणि तिने ऑपरेशन सुरू असताना पियानो वाजवला. बिरला रुग्णालयातून सौम्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या तिला आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

यापूर्वी अशीच एक घटना -

लंडन इथल्या किंग्स कॉलेज हॉस्पिटलमध्ये अशीच एक घटना घडली होती. ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन होत असताना एका महिलेनं वायोलिन वाजवलं होतं. ऑपरेशन सुरू असताना क्लासिक जैज सॉन्ग समरटाइम संगीत महिलेने वाजवलं होते. वायोलिनच्या सुमधूर धुनमध्ये ऑपरेशन यशस्वी झालं. डॅगमार टर्नर असे त्या महिला रुग्णांचे नाव आहे.

हेही वाचा -वय हा फक्त आकडा! 50 वर्षीय महिलेने पास केली नीट परीक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details