सोलनGangrape : देवभूमी हिमाचलमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सोलन जिल्ह्यातील चैल येथे सिलीगुडी येथील एका महिलेवर तिच्या पतीसमोर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केलाय. या आरोपींनी आधी महिलेच्या पतीला झाडाला बांधलं. नंतर त्या महिलेवर सामूहीक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. न्यायालयानं तिन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पतीसमोर सामूहिक बलात्कार : हिमाचलमधील सोलन जिल्ह्यातील चैलमध्ये सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका महिलेवर तिच्याच पतीसमोर तीन जणांनी बलात्कार केलाय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे राहणाऱ्या एका महिलेनं पोलिसांकडे तक्रार दिली होती. ज्यामध्ये तिनं सांगितलं की ती, पतीसह कठाळा गावातील शेतात 15-20 दिवसांपासून काम करत आहे. 24 ऑक्टोबर रोजी महिलेसह तिचा पती दसरा पाहण्यासाठी चैल बाजारात आले होते. सायंकाळी सातच्या सुमारास दोघेही आपल्या घराच्या दिशेनं येत होते. त्यावेळी चार जणांनी त्यांना गाठून पतीला झाडालं बांधल, तसंच महिलेवर सामूहीक बलात्कार केला.
तीघांनी केला बलात्कार : या चौघांपैकी वीरेंद्र तंसच चमन यांनी प्रथम महिलेला पकडून तिच्या पतीला दुपट्ट्यानं झाडाला बांधलं. त्यानंतर आरोपी वीरेंद्र, चमन, योगेंद्र यांनी पीडितेवर बलात्कार केला. त्याचवेळी या आरोपींचा चौथा साथीदार त्यांना समजावून सांगत होता, मात्र तिघांनीही त्याला शिवीगाळ करत पीडितेवर बलात्कार केला. तीन आरोपींनी महिलेवर तिच्या पतीसमोर सामूहिक बलात्कार केला.
आरोपींना तीन दिवसाची कोठडी : याबाबत पोलिस अधिक्षक सोलन गौरव सिंह यांनी सांगितलं की, पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी योगेंद्र, वीरेंद्र, चमन या तीन आरोपींना अटक केली आहे. ज्यांना कांदाघाट येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयानं तिन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा -
- Bharatpur Murder: ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या प्रकरणाला नवं वळण, भावानं भावाची हत्या करण्याचं काय आहे कारण?
- Surat Crime : घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीची सुरत पोलिसांनी काढली समजूत, मुंबईतील कुटुंबाकडे मुलगी परतली सुखरुप
- Financial Fraud In Mumbai : टेलिग्राम टास्कच्या आमिषापोटी इंजिनिअर अडकला, ४ लाखांना सायबर भुरट्यांनी घातला गंडा