नवी दिल्ली :चार रेल्वे कर्मचाऱ्यांनीच नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या फलाटावर बांधलेल्या एका खोलीत महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार रेल्वे कर्मचाऱ्यांना ( Railway Employee Arrested For Rape ) अटक केली आहे. यातील दोघांवर महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे, तर अन्य दोन कर्मचारी आरोपींसोबत तिथे उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास रेल्वे पोलिस करत आहेत.
पोलीस सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार, पीडित 28 वर्षीय महिला तिच्या कुटुंबासह राहते. काही काळापूर्वी तिची एका तरुणाशी ओळख झाली. त्याने सांगितले की, तो रेल्वेत काम करतो. गुरुवारी रात्री त्याने महिलेला भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनवर बोलावून घेतले. तो तिला प्लॅटफॉर्म क्रमांक ८-९ वरील एका खोलीत घेऊन गेला. काही वेळाने त्याचे आणखी तीन मित्र दारूच्या नशेत तेथे आले. महिलेचा आरोप आहे की, यापैकी दोन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला तर इतर दोन आरोपी तिथे उपस्थित होते. या घटनेनंतर त्याने महिलेला धमकावून तिथून हाकलून दिले.