अमरावती ( आंध्र प्रदेश ) - आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील विजयवाडा येथील सरकारी रुग्णालयात ( rape in Vijayawada government hospital ) अत्यंत भयानक घटना घडली आहे. एका 23 वर्षीय मानसिकदृष्ट्या अपंग महिलेवर तीन नराधमांनी सामूहिक ( gang rape in gov hospital ) बलात्कार केला. आरोपींनी जवळपास 30 तास तिच्यावर सामूहिक अत्याचार केले.
आरोपींनी शासकीय सामान्य रुग्णालय परिसरात निर्जनस्थळी नेऊन गतीमंद महिलेवर ( Rape on Mentally Retarded Woman ) लैंगिक अत्याचार केले. घरातून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पीडित मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई ( vijaywada police ) केली नाही. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे पीडितेच्या कुटुंबीयांना पीडितेच्या संरक्षणासाठी तेथे जावे लागले. परंतु तरीही पीडितेवर लैंगिक अत्याचार झाले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली नसती तर ही वेळ आली नसती असा पीडितेच्या कुटुंबाचा दावा आहे.
लग्नाची थाप मारून घरातून नेले- विजयवाडामध्ये 23 वर्षीय महिला मतिमंद राहते. 19 एप्रिलला ती घरी एकटी असताना त्याच भागातील दारा श्रीकांत ( वय 26 ) याने तिला लग्न करून नोकरी लावून देतो अशी थाप मारली. पेस्ट कंट्रोल विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणारा श्रीकांत ड्युटीवर असताना तरुणीला सोबत घेऊन गेला. त्याने तिला रात्रभर पेस्ट कंट्रोल युनिटच्या खोलीत कोंडून ठेवले. तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी 20 तारखेला सकाळी तिला हॉस्पिटलमध्ये सोडून तो घरी गेला. चेन्ना बाबूराव ( वय 23 ), रुग्णालयातील कंत्राटी कामगार आणि त्याचा मित्र जोरंगुला पवन कल्याण ( वय 23 ) या दोघांनी तिला दुसऱ्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.