महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

G20 Summit : भारत मंडपममध्ये भोजनाकरिता निमंत्रण नाही... विरोधकांची मोदी सरकारवर टीका

G20 Summit : दिल्लीतील भारत मंडपम इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या डिनरसाठी कोणत्याही विरोधी नेत्याला आमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी, सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांनी मोदी सरकारवर टीका केलीय.

G20 Summit
G20 Summit

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 11:06 PM IST

नवी दिल्ली / ब्रुसेल्सG20 Summit : : दिल्लीतील G20 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनानं जारी केलेल्या रात्रीच्या जेवणाच्या निमंत्रण पत्रिकेवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यातच शनिवारी प्रगती मैदानावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांसाठी आयोजित केलेल्या भोजनाचं निमंत्रण एकाही विरोधी नेत्याला न मिळाल्यानं विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी भाजपाचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचा पुनरुच्चार केलाय.

विरोधी नेत्यांना सरकार महत्त्व देत नाही :यावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ब्रुसेल्समध्ये निशाना साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे प्रमुख तसंच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना जी-२० गाला डिनरचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. पुढ बोलतांना ते म्हणाले की, भारताच्या 60 टक्के लोकांनी निवडूण दिलेल्या विरोधी नेत्यांना सरकार महत्त्व देत नाही.

केंद्र सरकार निरंकुश :या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) सरचिटणीस डी राजा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं की, आम्हाला कोणतेही राष्ट्रपतीकडून कोणतही आमंत्रण मिळालेलं नाही. त्यावरुन असं दिसतंय की केंद्र सरकार (भाजपा)चा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यामुळं ते विरोधकांना बोलवत नाहीत. त्याच्यांच मताचा पुनरुच्चार करताना माजी खासदार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय-मार्क्सवादी) नेते हन्नान मोल्ला म्हणाले की, सध्याचं केंद्र सरकार निरंकुश पद्धतीनं देशावर राज्य करत आहे. भाजपाचा विरोधात कोणताही विरोध नसावा, यासाठी ते वन नेशन वन इलेक्शनचा फॉर्म्युला घेऊन पुढे आले आहेत.

देशाचं नाव बदलण्याचा प्रयत्न :राष्ट्रपती भवनानं G20 डिनरसाठी नुकत्याच पाठवलेल्या निमंत्रणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'इंडियाचे राष्ट्रपती' ऐवजी 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधित करण्यात आलं होतं. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. सरकार देशाचं नाव बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर केला होता. विशेष म्हणजे काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनाही या डिनर पार्टीला आमंत्रित करण्यात आलेलं नाही. सूत्रांनी सांगितलं की, सर्व कॅबिनेट, राज्यमंत्री, सर्व मुख्यमंत्री तसेच भारत सरकारच्या सचिवांना डिनरसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, एचडी देवेगौडा यांचाही निमंत्रण यादीत समावेश आहे. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे देवेगौडा यांनी सांगितलंय. त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडूनही उपस्थित राहण्यासंदर्भात कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. सिंग देखील अनेक दिवसांपासून आजारी आहेत.

गाला डिनरसाठी निकष :मात्र, यावर भाजपा राज्यसभा खासदार भुवनेश्वर कलिता यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलंय. “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या गाला डिनरसाठी आमंत्रित करण्याचे काही निकष आहेत. जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात भाजपा खासदारांनाही निमंत्रित केलेलं नाही असं त्या म्हणाल्या. ही एक जागतिक घटना आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणाचं राजकारण करणं थांबवायला हवं. विमानतळावर परदेशी नेत्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना सोपवण्यात आली आहे. “कार्यक्रमासाठी निमंत्रित नेत्यांना पाठवताना अत्यंत कठोर निकष पाळले गेले आहेत,” असा दावा कलिता यांनी केला.

एवढेच नाही तर मुख्यमंत्री बिहारचे नितीश कुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यात सहभाग घेणार असल्याची माहिती आहे. त्याचं अनुषंगानं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे देखील डिनरसाठी शुक्रवारी रात्री दिल्लीत पोहोचले आहेत. सूत्रांनी सांगितले की, सर्व निमंत्रित पाहुण्यांना शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संसद भवनात पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. तेथून त्यांना विशेष वाहतूक व्यवस्थेद्वारे प्रगती मैदानावरील भारत मंडपात नेलं जाईल.

हेही वाचा -

  1. G20 Summit : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नीसह भारतात दाखल
  2. Putin Xi Jinping Absent G 20 Summit : जी-२० परिषदेला पुतिन, शी जिनपिंग अनुपस्थित, इंडो-पॅसिफिक राजकारणावर परिणाम
  3. Joe Biden reach Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा सुरू, 'या' मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details