नवी दिल्ली- ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीईए) ऊसाच्या किमान हमीभाव (एफआरपी) वाढून प्रति क्विटंल 290 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषेदत दिली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विटंल किमान 290 रुपये भाव द्यावा लागणार आहे. मात्र, हे 10 टक्के रिकव्हरीवर (उत्पादक क्षमता) अवलंबून असणार आहे. जर शेतकऱ्यांची रिकव्हरी 9.5 टक्क्यांहून कमी असेल तर एफआरपी ही 275 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांनी उत्पादक क्षमता वाढवावी, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री गोयल यांनी व्यक्त केली.
हेही वाचा-प्रेम प्रकरणातून कुटुंबीयांनी केली प्रियकराची हत्या; घरात पुरला मृतदेह
गतवर्षी सुमारे 70 लाख टन साखरेची निर्यात
पीयूष गोयल म्हणाले, की देशातील उत्पादन क्षमता वाढत आहे. उसापासून साखरेचे उत्पादन घेण्याचे प्रमाणही वाढत आहे. गतवर्षी साखरेची विक्रमी निर्यात झाली. गतवर्षी सुमारे 70 लाख टन साखरेची देशामधून निर्यात झाली आहे.