महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Friendship Day 2022 : ‘रूप नगर के चीते’ मधील करण परब आणि कुणाल शुक्लची मैत्री - दिग्दर्शन विहान सूर्यवंशी

‘रूप नगर के चीते’ ( Roop Nagar Ke Cheete ) चित्रपटाने करण परब आणि कुणाल शुक्लमध्ये ( Karan Parab and Kunal Shukla Friendship ) मैत्रीचे धागे जोडले. मैत्रीचा असाच हात हातात घेऊन करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा अभिनेते ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर पदार्पण करतायेत. ‘ऑनस्क्रीन’ आणि ‘ऑफस्क्रीन’ जुळलेले हे मैत्रीचे धागे या चित्रपटातूनही पहायला मिळणार आहेत.

kunal parab and karan shulk
करण परब आणि कुणाल शुक्ल

By

Published : Aug 7, 2022, 3:41 PM IST

मुंबई - प्रत्येक कामाच्या जागेत मैत्रीबंध जूळत असतात. मनोरंजनसृष्टीही याला अपवाद नाही. शूटिंग्स दरम्यान अनेक फ्रेंडशिप्स बहरल्या आहेत. ‘शब्दांपेक्षा सोबतीचे सामर्थ्य जास्त असते. म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते’ या उक्तीनुसार ‘रूप नगर के चीते’ ( Roop Nagar Ke Cheete ) चित्रपटाने करण परब आणि कुणाल शुक्लमध्ये ( Karan Parab and Kunal Shukla Friendship ) मैत्रीचे धागे जोडले.

चित्रपटातून रुपेरी पडदयावर पदार्पण -मैत्रीचा असाच हात हातात घेऊन करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा अभिनेते ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर पदार्पण करतायेत. ‘ऑनस्क्रीन’ आणि ‘ऑफस्क्रीन’ जुळलेले हे मैत्रीचे धागे या चित्रपटातूनही पहायला मिळणार आहेत. मैत्री कुठे, कधी, कशी होईल ? हे सांगता येत नाही. करण परब आणि कुणाल शुक्ल यांच्या मैत्रीचा धागा जुळला तो ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटामुळे. दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीची कथा 'रूप नगर के चीते' या चित्रपटातून पहाता येणार आहे. एस एंटरटेन्मेंट ( S Entertainment ) बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन विहान सूर्यवंशी ( Director Vihaan Suryavanshi ) यांचे आहे.

क्रिकेटर ते अभिनेता प्रवास -क्रिकेटर ते अभिनेता असा प्रवास करणारा अभिनेता करण परब याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये UAE चे प्रतिनिधित्व केले आहे. आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी २००७ मध्ये तो पुण्यात आला. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे शिक्षण घेत असताना करणला अभिनयाची गोडी लागली. त्यानंतर स्वतंत्र थिएटर येथे अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेत त्यांनी आपली आवड जपली. त्यानंतर अनेक जाहिराती, म्युझिक अल्बम, प्रिंट शूट त्यांनी केल्या. आणि आता ‘रूप नगर के चीते’ मध्ये तो मध्यवर्ती भूमिकेत आहे. मराठी आणि हिंदी रंगभूमी गाजवणाऱ्या कुणाल शुक्ल याने नाटयक्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. ‘बीइंग सेल्फिश’, ‘एक्सपेरीमेंट’ या त्याच्या नाटकांना अनेक पारितोषिकही मिळाली आहेत. 'रूप नगर के चीते' मधून तो रुपेरी पडदा गाजवायला सज्ज झाला आहे.

‘होऊन जाऊ दे’ गाणे प्रदर्शित -त्यांच्या घनिष्ट मैत्रीवर आधारित ‘होऊन जाऊ दे’ हे धमाल गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. हे धमाकेदार गाणं गायक आदर्श शिंदे आणि सौरभ साळुंखे यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. जय अत्रे यांनी लिहिलेल्या या गाण्याला बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार मनन शाह यांनी सुरेल संगीताची किनार जोडली आहे.‘अखियाँ मिलावांगा’, ‘तेरे लिये’, ‘सावन बैरी’ यांसारखी बॉलीवूडमधील अनेक हिट रोमँटिक गाणी मनन शाह यांनी संगीतबद्ध केली आहेत. त्याचप्रमाणे ‘नमस्ते इंग्लंड’, ‘कमांडो 2’, ‘कमांडो वन मॅन आर्मी ‘द ब्लॅक मनी ट्रेल’ या हिंदी चित्रपटातील गाण्यांना त्यांचे संगीत लाभले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'चेजिंग द रेनबो' या लघुपटासाठीही त्यांनी संगीत दिले आहे. संगीतासाठी भारतीय वाद्यांचा वापर आणि लाइव्ह रेकोर्डिंग ही त्यांच्या संगीताची ख़ास खासियत आहे. आता 'रूप नगर के चीते' चित्रपटामधून त्यांच्या संगीताची जादू अनूभवायला मिळणार आहे. मस्ती, ऍक्शन, इमोशन आणि ड्रामा याने परिपूर्ण 'रूप नगर के चीते' १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा -NCP Leader Nawab Malik : माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी सत्र न्यायालयाची परवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details