पटणा ( बिहार ) : बिहारमधील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका मदरशाच्या शौचालयात 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलीस कुटुंबीयांच्या जबाबावरून एफआयआर नोंदवून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना सोमवारी घडली आहे. गावातीलच एका तरुणाने चिमुरडीवर बलात्कार केल्याचे बोलले जात आहे.
मदरशाच्या शौचालयात मुलीवर बलात्कार :घटना गावातील मदरशात असलेल्या शौचालयात घडली आहे. घटनेच्या वेळी मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून मौलवी येत असल्याचे पाहून आरोपी पळून गेला. पीडित मुलीच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे की, या घटनेनंतर गावातील लोकांनी आधी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र बुधवारी मुलीची आई आणि कुटुंबीयांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठून त्यांच्या मुलीसोबत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. त्यानंतर कुटुंबीयांच्या अर्जाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा क्रमांक 79/23 मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या आईने सांगितली संपूर्ण घटना : पीडितेच्या आईने दिलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, सोमवारी सुट्टीनंतर गावातील एका १८ वर्षीय तरुणाने त्यांच्या मुलीवर जबदस्ती केली. त्यानंतर, मुलीचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी मुलीचा आरडाओरडा ऐकून मौलवी शौचालयाच्या दिशेने गेले. मौलवी येताना पाहून आरोपीने तिथून पळ काढला. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. कुटुंबीय कारवाईसाठीच्या त्यांच्या भूमीकेवर ठाम आहे.