महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Road Accident In Gurugram भरघाव वेगात आलेल्या ट्रकची इनोव्हाला धडक चौघांचा जागीच मृत्यू - गुरुग्राममध्ये रस्ता अपघात

हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यात भीषण रस्ता अपघातात Road Accident In Gurugram एका मुलीसह ४ जणांचा मृत्यू Four Died Road Accident झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. उदयपूरहून परतणाऱ्या इनोव्हा कारवर भरधाव वेगाने जात असलेला ट्रक उलटला. या भीषण अपघातात एक मुलगी आणि तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला.

FOUR DIED ROAD ACCIDENT IN GURUGRAM
भरघाव वेगात आलेल्या ट्रकची इनोव्हाला धडक चौघांचा जागीच मृत्यू

By

Published : Aug 16, 2022, 11:05 AM IST

गुरुग्राम हरियाणा दिल्लीला लागून असलेल्या हरियाणाच्या गुरुग्राममध्ये भीषण रस्ता अपघातात Road Accident In Gurugram एका मुलीसह चार जणांचा मृत्यू Four Died Road Accident झाला. तर दोन जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण राजस्थानच्या उदयपूर येथून फिरून परतत होते. ही इनोव्हा गुरुग्रामच्या NH 48 वर येताच समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकला धडकली. यानंतर अनियंत्रित ट्रक इनोव्हावर पलटी झाला, त्यामुळे कारमध्ये बसलेले सर्व जण गाडले गेले.

ही घटना बिलासपूर गुरुग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. रात्री उशिरा 1.45 च्या सुमारास भरधाव ट्रक रस्त्यावरून जाणाऱ्या इनोव्हा वाहनावर उलटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी भेट दिली असता ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याचे दिसून आले.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तातडीने कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. गुरुग्राम पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये ठेवले आहेत. याशिवाय कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की इनोव्हा बसलेले लोक राजस्थानच्या उदयपूर शहरातून फिरून परतत होते. तेथून ते आपल्या घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला.

हेही वाचाMainpuri Accident मैनपुरीत अनियंत्रित झालेला ट्रक घरात घुसल्याने चौघांचा जागीच मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details