मिलिटरी स्टेशनमध्ये गोळीबारात चार जणांचा मृत्यू अमृतसर- भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळीबारात चार जवान ठार झाले. ही घटना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ही संकटाची स्थिती पाहता स्टेशन क्विक रिअॅक्शन टीम्स सक्रिय करण्यात आल्या आहेत. परिसराची नाकेबंदी करून सील करण्यात आले. भटिंडा मिलिटरी स्टेशन हे लष्कराच्या दक्षिण पश्चिम कमांड अंतर्गत येते. साउथ वेस्टर्न कमांडने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहाटे ४.३५ वाजता भटिंडा मिलिटरी स्टेशनच्या आत गोळीबाराचे आवाज ऐकू आला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लष्कराच्या दक्षिण पश्चिम कमांडटने स्टेशन क्विक रिअॅक्शन टीम्स सक्रिय झाल्याची माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वीच चोरीला गेल्या होत्या रायफल- आरोपींना शोधण्यासाठी शोध मोहिम सुरू आहे. सध्या या घटनेमागच्या कारणांची माहिती मिळू शकलेली नाही. गोळीबार करणारा हा व्यक्ती साध्या वेशात असल्याची माहिती समोर येत आहे. ही दहशतवादी घटना नसल्याचे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच मिलिटरी स्टेशनमधून रायफल चोरीला गेल्या होत्या. भटिंडा मिलिटरी स्टेशन हे महत्त्वाचे लष्करी स्टेशन आहे. येथे मोठ्या संख्येने लष्कराचे जवान त्यांच्या कुटुंबियांसह राहतात. या प्रकरणी लवकरच अधिक माहिती दिली जाईल, असे लष्कराच्या दक्षिण पश्चिम कमांडकडून सांगण्यात आले आहे.पंजाब पोलिसांनी सांगितले की, भटिंडा येथील आर्मी कॅन्टचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी 28 काडतुसे असलेली रायफल बेपत्ता झाली होती. या घटनेमागे लष्कराचे काही जवान असू शकतात. हे लष्करी स्थानक सामरिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचे मानले जाते.
भटिंडामध्ये सुरक्षाव्यवस्थेत वाढ-खलिस्तानी धर्मोपदेशक आणि 'वारीस पंजाब दे' प्रमुख अमृतपाल सिंग याने अनुयायांना बैसाखीच्या दिवशी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील बैसाखी उत्सवापूर्वी भटिंडा येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक सुरिंदर पाल सिंग परमार म्हणाले होते की, पंजाबमध्ये परिस्थिती सामान्य आहे. आम्ही लोकांच्या सोयीसाठी येथे आहोत. बैसाखीच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी राज्यात भेट द्यावी अशी आमची इच्छा आहे. यामुळे पंजाबमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचा सकारात्मक संदेश जाईल. कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत.पंजाबमधून अलीकडेच अटक करण्यात आलेला अमृतपालचा जवळचा सहकारी पापलप्रीतसिंग याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेतल्यानंतर आसाममधील तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
गोळीबारात दहशतवाद्यांचा हात नाहीभटिंडा मिलिटरी स्टेशन गोळीबाराच्या घटनेवर पंजाबचे मंत्री अनमोल गगन मान म्हणाले, हे अंतर्गत वादाचे प्रकरण आहे. मी एसएसपीशी बोललो आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.भटिंडा मिलिटरी स्टेशनमधील घटनेबाबत संरक्षण तज्ज्ञ कर्नल डॉ. डीएस म्हणाले की, ही अंतर्गत वादाची घटना आहे. लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या भांडणात ही घटना घडली. सैन्यात तणावाचे वातावरण असल्याने अशा घटना घडतात. कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कुटुंबापासून दूर असलेल्या जवानांना प्रेमाने वागवले पाहिजे. भटिंडातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे, तेथे दहशतवादी घटना घडण्याची शक्यता नाही. उर्वरित तपास सुरू असून त्यानंतर सर्व माहिती समोर येईल. शहीद जवान हे आर्टिलरी युनिटचे होते. भटिंडाचे एसएसपी गुलनीत खुराना यांनी गोळीबारात दहशतवाद्यांचा हात नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घटनेबाबत सविस्तर माहिती मागविली आहे.
हेही वाचा-Earthquake In Bihar: बिहारच्या काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के, 4.3 रिश्टर स्केलची नोंद