महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Heath Streak Death : हिथ स्ट्रीकची कर्करोगानं घेतली विकेट, शेवटी अफवा ठरली खरी!

Heath Streak Death: झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हिथ स्ट्रीक यांचं वयाच्या 49 व्या वर्षी निधन झालंय. स्ट्रीकचा रविवारी पहाटे माताबेलँड येथील त्याच्या शेतात मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या पत्नी नडाइन स्ट्रीक सोशल मिडियावर दिलीय.

Heath Streak Death
Heath Streak Death

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 6:59 PM IST

हरारे Heath Streak Death : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हिथ स्ट्रीक यांच्या निधनाच्या दु:खद वृत्तानं क्रिकेट जगताला धक्का बसलाय. स्ट्रीकचा रविवारी पहाटे माताबेलँड येथील त्याच्या शेतात मृत्यू झाला. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हीथची पत्नी नडाइन स्ट्रीक यांनी फेसबुकवर या बातमीची पुष्टी केली. तसंच झिम्बाब्वेचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जॉन रेनी यांनी सांगितलं की,“मटाबेलँड येथील त्यांच्या फार्महाऊसवर पहाटे त्यांचा मृत्यू झाला,”. तिथ स्ट्रीक त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते. कर्करोगाशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर त्यांचं निधन झालं.

स्ट्रीकवर आठ वर्षांची बंदी :सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, स्ट्रीकचे माजी सहकारी हेन्री ओलोंगा यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूची बातमी दिली होती. मात्र ती बातमी खोटी निघाल्यानंतर ओलोंगा यांनी स्ट्रीकची माफी मागितली होती. झिम्बाब्वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं 2018 मध्ये भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन केल्याबद्दल स्ट्रीकवर आठ वर्षांची बंदी घातली होती.

आंतरराष्ट्रीय संघांना प्रशिक्षण :झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटू स्ट्रीकनं कसोटीत 216 तसंच एकदिवसीय सामन्यात 239 विकेट घेतल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्ट्रीकनं झिम्बाब्वे, बांगलादेश, कोलकात्ता नाइट रायडर्स, राजकोट या आंतरराष्ट्रीय संघांना इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रशिक्षण दिलं होतं. कसोटी तसंच एकदिवसीय सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा स्ट्रीक पहिला एकमेव झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्ट्रीक 2 हजार धावा तसंच 200 बळी घेणारा देशातील एकमेव क्रिकेटपटू होता.

पत्नीची समाजमाध्यमावर पोस्ट : स्ट्रीकनं 1993 मध्ये कसोटी तसंच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 1999 ते 2000 दरम्यान स्ट्रीकची झिम्बाब्वे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याची पत्नी नादिन स्ट्रीकनं फेसबुकवर लिहिलं की, “आज रविवार ३ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटे, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेम तसंच माझ्या सुंदर मुलांच्या वडिलांना देवदूतांसोबत राहण्यासाठी आमच्या घरातून त्यांना घेऊन गेले. स्ट्रीकला आपले शेवटचे दिवस कुटुंबाजवळच्या प्रियजनांसोबत घालवायचे होते. स्ट्रीक खूप प्रेमळ, शांततापूर्ण स्वभावाचा व्यक्ती होता. तो कधीही एकटा कुठे एकटा फिरायला जात नसे. माझं आणि त्याच नात, फक्त पती-पत्नीचं नव्हतं, तर आम्ही खूप चांगले मित्र देखील होतो. आम्ही एकमेकांच्या मनात काय सुरु आहे, हे न बोलता ओळखत होतो. आमचे शरीर जरी वेगळं असलं तरी आत्मे अनंतकाळसाठी एक झाले होते, स्ट्रीक जोपर्यंत तू माझ्या आठवणीत आहेस तोपर्यंत मनाने तू कधीही दूर जाणार नाहीस.” असं त्याची पत्नी नादिन स्ट्रीकनं लिहलंय.

हेही वाचा -

  1. IND vs PAK Asia Cup 2023 : आफ्रिदी-रौफ जोडीसमोर टीम इंडियाचा टॉप ऑर्डर फ्लॉप
  2. Ind Vs Pak Asia Cup २०२३ : भारत-पाकिस्तान सामना, पावसामुळे फिरले पाणी, भारताचा डाव संपल्यावर सामना रद्द
  3. Ind Vs Pak Asia Cup 2023: आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यावर भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details