मांड्या (कर्नाटक) -कर्नाटकचे माजी खासदार जी मेड गौडा यांचे निधन झाले. ते ९४ वर्षाचे होते. जी मेड गौडा हे फुफ्फसाच्या व्याधीने ग्रस्त होते. यामुळे त्यांच्यावर मांड्या जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जी मेड गौडा यांच्या निधनावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
जी एस मेड गौडा हे महात्मा गांधी यांच्या विचारधारेवर चालणारे होते. ते कावेरी नदीच्या पाणी वाटपासंदर्भात झालेल्या आंदोलनात अग्रस्थानी होते. जी मेड गौडा हे मांड्याचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. ते कुरुगावल्लू येथून विधानसभेवर सहा वेळा निवडून गेले होते.
विद्यार्थी दशेत जी मेड गौडा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असल्याचे सांगितलं जात आहे. या लढ्यादरम्यान, ते कारागृहात देखील गेले होते. मांड्या जिल्ह्यातील गुरूदेवराहल्ली येथे १९२८ साली जन्मलेल्या जी मेड गौडा यांनी म्हैसूरमधील महाराजा कॉलेज आणि बंगळुरू येथील सरकारी लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.