महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Oommen Chandy passes away : केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे दीर्घ आजाराने निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - विधानसभा निवडणुकीत विजय

केरळ काँग्रेसचे दिग्गज नेते ओमन चांडी यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने केरळ काँग्रेसमधील लोकनेता गमावला आहे. ओमन चांडी यांनी तब्बल 12 वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

Oommen Chandy passes away
केरळ काँग्रेसचे दिग्गज नेते ओमन चांडी

By

Published : Jul 18, 2023, 7:10 AM IST

Updated : Jul 18, 2023, 7:23 AM IST

तिरुअनंतपुरम :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. बंगळुरूच्या चिन्मय मिशन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे केरळमधील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ओमन चांडी यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या मुलाने सोशल मीडियातून दिली आहे.

घशाच्या आजाराने होते ग्रस्त :ओमन चांडी हे बऱ्याच दिवसापासून घशाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे 2019 पासून त्यांची प्रकृती खालावली होती. ओमन चांडी यांना घशाचा आजार झाल्याने उपचारासाठी जर्मनीला नेण्यात आले होते. मात्र तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. 1970 पासून ओमन चांडी हे पुथुपल्ली मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करत होते. त्यांचा मुलगा चांडी ओमान याने मंगळवारी पहाटे 5 वाजता सोशल माध्यमातून वडील ओमन चांडी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यामुळे केरळमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.

तब्बल 12 वेळा निवडणूक जिंकणारा लोकनेता :ओमन चांडी हे कोट्टायम जिल्ह्यातील पुथुपल्ली या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत होते. पुथुपल्ली या मतदार संघातून त्यांनी तब्बल 12 वेळा विधानसभा मतदार संघात निवडणूक जिंकली आहे. केरळमधील लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती. आपल्या कामामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ चांगलाच गाजवला होता. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी जनसंपर्क कमी होऊ दिला नाही. जनतेचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवल्यामुळे नागरिकांमध्ये ते लोकप्रिय नेते होते.

वित्त आणि गृह मंत्रीपदाची पेलली यशस्वी जबाबदारी :ओमन चांडी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वाच्या पदावर काम केले आहे. ओमन चांडी यांनी के करुणाकरण, ए के अँटनी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. ओमन चांडी यांनी गृह मंत्रालय, वित्त मंत्रालयासह कामगार मंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेत काँग्रेसने त्यांना 2018 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीत सरचिटणीस म्हणून नियुक्त केले होते. त्यासह ओमन चांडी यांनी 2006 ते 2021 या काळात केरळ विधान सभेत विरोधी पक्षनेता म्हणूनही कार्य केले आहे. ओमन चांडी यांच्या पश्चात पत्नी मरियम्मा ओमान, मुलगा चांडी ओमन, मुलगी मारिया आणि अचू असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

Last Updated : Jul 18, 2023, 7:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details