महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशांतर्गत विमान प्रवासात आजपासून खानपान सुविधा बंद

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आजपासून दाेन तासांंहून कमी अंतराच्या विमान प्रवासात खानपान सुविधा मिळणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

खान पान सुविधा बंद
खान पान सुविधा बंद

By

Published : Apr 15, 2021, 1:28 PM IST

मुंबई - काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आजपासून दाेन तासांंहून कमी अंतराच्या विमान प्रवासात खानपान सुविधा मिळणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

हवाई वाहतूक मंत्रालयाचा निर्णय...

प्रवासात खानपानाकरिता प्रवासी मास्क काढून ठेवतात. त्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता जास्त असते. शिवाय खाद्यपदार्थांचा पुरवठा करताना विमान कर्मचारी प्रवाशांच्या संपर्कात येतात. परिणामी प्रवाशांपासून किंवा त्यांच्यापासून प्रवाशांना काेराेना विषाणूची बाधा होण्याचा धोका अधिक असताे. त्यामुळे दाेन तासांहून कमी अंतराच्या प्रवासात आता खानपान सेवा बंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. ‘‘दोन तासांपेक्षा कमी अंतराच्या विमान प्रवासासाठी हा निर्णय लागू आहे. इतर विमानात खानपान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे." असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नियमावली जाहीर...

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणतेही नियम नसतील, असे हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाध्ये यांनी स्पष्ट केले. तसेच लांब पल्ल्याच्या विमानात खानपान सुविधा मिळणार असली तरी त्यासाठीही नियमावली जाहीर केली आहे. विमान कंपन्या डिस्पोजल प्लेटमध्ये खाद्यपदार्थ देऊ शकतील, मात्र पेयपदार्थ बंद स्वरुपात देणे बंधनकारक आहे. प्रवाशांच्या समोर ओतून देण्यात येणाऱ्या पेयपदार्थांवर बंदी घातली आहे. तसे पदार्थ आधीच डिस्पोजल ग्लासमध्ये भरून प्रवाशांपर्यंत पोहोचवता येतील. प्रत्येक प्रवाशाला सेवा देताना नवीन ग्लोव्हज् वापरण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details