गरियाबंद- छत्तीसगडमध्ये गरियाबाद जिल्ह्यात एक कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ५ जण जागीच ठार झाले, तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्व महिलांचाच समावेश आहे. एका खासगी कार्यक्रमावरून परतत असताना शनिवारी मध्यरात्री हा दुर्दैवी अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना लोकांना रायपूर येथे पाठवण्यात आले आहे.
मृत महिला एकमेकांच्या नातेवाईक
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३० वर हा अपघात घडला. कार चालकाला झोपेची डुलकी आल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कोपरा येथील वळणावर इको कार एका झाडाला धडकली. या कारमध्ये एकूण ११ जण प्रवास करत होते. ज्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
गरियाबंद येथील रस्ता अपघातात ५ मृत्यू, तर ६ जखमी अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. त्यावेळी कारचालक स्टेरिंगमध्येच अडकला होता. मोठ्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच एडिशनल एसपी सुखनंदन राठौर लगेच घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेतील जखमींना रायपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाला झोपेची गुंगी येत असल्याने गाडी झाडावर धडकली. अपघातामधील मृत महिला या एकमेकांच्या नातेवाईक आहेत.
हेही वाचा -स्वइच्छेने धर्मांतरण करुन लग्न न करताही सोबत राहणाऱ्यांना सुरक्षा देणे ही पोलिसांची जबाबदारी - अलाहाबाद उच्च न्यायालय