1) धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगात सामना, ठाकरे गट दुपारी 1 वाजता उत्तर दाखल करणार : शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण चिन्ह कुणाचे यावर निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या लढाईत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. ठाकरे गट (Thackeray Group) आज दुपारी एक वाजता आपले प्राथमिक उत्तर निवडणूक आयोगात दाखल करणार आहे.( Five Of News Stories ) ( News stories of national and local importance )
2)डहाणू स्थानककात घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे शनिवारी आणि रविवारी ( 8- 9 ऑक्टोबर) अनेक गाड्या होणार प्रभावित : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अंत्यत महत्त्वाची बातमी आहे. शनिवारी आणि रविवारी ( 8- 9 ऑक्टोबर) डहाणू रोड स्टेशनवर ब्लाॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम होणार आहे. तसेच या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी काही बाहेरगावच्या गाड्यांना अतिरिक्त स्थानकांवर थांबवले जाणार आहे.
3)राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना स्थगित; NCERT कडून नोटिफिकेशन जारी : देशभरात घेतली जाणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTSE) पुढील स्थगित करण्यात आली आहे. NCERT ने एक नोटिफिकेशन काढलं आहे. शिवाय NCERT च्या संकेतस्थळावर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करणे हे योजनेचे उद्दिष्ट असते. ही योजना पुढे चालू ठेवण्यास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अद्याप नव्याने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे या परीक्षेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
4)राज्यात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार, गावं जलस्वयंपूर्ण करणार : रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 2025 पर्यंत 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येणार आहे. पुण्यात नैसर्गिक शेती राज्यस्तरीय परिषद 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
5)इन्स्टाग्राम फॉलोअर्सवरुन वाद, भावाच्या मदतीने रचला मित्राला संपवण्याचा कट : उत्तर दिल्ली परिसरात एका दिवसापूर्वी एका तरुणाची हत्या केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. या संपूर्ण घटनेत एका अल्पवयीन मुलीचा सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येवरुन वाद झाला आणि तो विकोपाला जाऊन हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अल्पवयीन तरुणी, तिचा भाऊ आणि एका मित्राला अटक केली आहे. तर तरुणीचा आणखी एक मित्र फरार आहे.