महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

First Solar Eclipse Of The Year : 10 एप्रिलला वर्षातील पहिले सूर्यग्रहण, 'या' तीन राशींचे भाग्य चमकणार, वाचा सविस्तर - Astro News

2023 मधील वर्षातील पहिले खग्रास सूर्यग्रहण 10 एप्रिल रोजी आहे. वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा प्रभाव तीन राशींसाठी वृषभ, मिथुन आणि धनु राशीसाठी चांगला ठरणारा आहे. तर मेष, सिंह, कन्या, मकर आणि वृश्चिक या पाच राशींसाठी ते अपायकारक सिद्ध होऊ शकते. जाणून घ्या सविस्तर

First Solar Eclipse Of The Year
वर्षातील पहिले सूर्यग्रहण

By

Published : Feb 10, 2023, 2:53 PM IST

हैद्राबाद : वर्षे 2023 मधील पहिले सूर्यग्रहण 10 एप्रिल रोजी आहे. हे सूर्यग्रहण 10 एप्रिल रोजी सकाळी 07 वाजून 05 मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी 12 वाजुन 29 मिनिटांनी संपेल. हे खग्रास सूर्यग्रहण आहे. हे भारतात दिसणार नाही, पण ज्योतिषशास्त्रानुसार सर्व राशींवर त्याचा परिणाम होईल. वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा प्रभाव तीन राशींसाठी वृषभ, मिथुन आणि धनु राशीसाठी चांगला होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर मेष, सिंह, कन्या, मकर, आणि वृश्चिक या पाच राशींना त्याचे दुष्परिणाम सिद्ध करावे लागेल, अशी माहिती ज्योतिष्याचार्य शिव मल्होत्रा यांनी दिली. सविस्तरपणे जाणून घेऊया कोणकोणत्या राशींवर सूर्यग्रहणाचा कसा प्रभाव असेल ते.

सूर्यग्रहण कालावधी : सूर्यग्रहण 10 एप्रिल रोजी सकाळी 07:05 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12:29 वाजता समाप्त होईल.सूर्यग्रहणाचा प्रभाव 3 राशींवर सकारात्मक आणि 05 राशींवर नकारात्मक राहील.

मेष राशी : रवि तुमच्या राशीत असेल, त्यामुळे धनहानी किंवा उधळपट्टीमुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. नोकरीत प्रगतीचा अभाव आणि खराब आरोग्य तुम्हाला त्रास देऊ शकते. दररोज सूर्यदेवाची आराधना करा. सकाळी आंघोळ करुन जल अर्पण करा.

वृषभ राशी :सूर्यग्रहणाचा प्रभाव सकारात्मक राहील. पगारवाढ, नवीन नोकरी, पदात वाढ ही बेरीज आहे. सूर्याच्या कृपेने जीवन सुखी होईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. बाहेर फिरायला जाण्याचा बऱ्याच दिवसांपासुन सुरु असलेला फ्लॅन पूर्ण होईल.

मिथुन राशी : सूर्यग्रहणामुळे अचानक आर्थिक लाभ होईल. कामात यश मिळेल. मोठे पद मिळू शकते. वादविवादाच्या बाजूने राहतील. मिथुन राशीच्या लोकांनी थांबवलेली कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. तसेच दररोज पूजा-पाठ करावी.

कन्या राशी : तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा एखादी मौल्यवान वस्तू गमावण्याची भीती आहे. विरोधकांची संख्या वाढेल. वाहन सावधपणे चालवा. संयमाने काम करावे लागेल. घरातुन निघतांना देवाची पूजा करुन बाहेर पडा, सकारात्मक राहा.

सिंह राशी : सूर्यग्रहण तुम्हाला मानसिक तणाव देऊ शकते. कारण तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात यश मिळू शकणार नाही. पगार न वाढल्याने मन अस्वस्थ राहील. परिस्थिती बदलत राहते तेव्हा निराश न होता, कार्य आणि ध्यान सुरु ठेवा.

धनु राशी :सूर्याच्या कृपेने नशीब बलवान राहील. व्यवसायात नफा आणि नोकरीत प्रतिष्ठा वाढेल. प्रथम आर्थिक बाजू मजबूत होईल. जीवन आनंदी होईल. नोकरी बदल होण्याची शक्यता आहे, ही नोकरी तुम्हाला समाधान देऊन जाईल.

वृश्चिक राशी : पैशाचा चुकीचा वापर तुम्हाला अडचणीत आणू शकतो. बँकेकडून कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. तुमचे शत्रूही वर्चस्व गाजवू शकतात. अपघात होण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्या. गरजेचा नसल्यास प्रवास करणे आणि रात्रीचा प्रवास करणे टाळा.

मकर राशी : सूर्यग्रहणाचा नकारात्मक प्रभाव नोकरी आणि व्यवसायात दिसून येईल. नवीन आव्हानांना संयमाने सामोरे जा. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. दर शनिवारी हनुमान चालिसा जप करा. तसेच बाहेर जातांना सकारात्मक ऊर्जेने काम करा.

ABOUT THE AUTHOR

...view details