नवी दिल्ली : भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली पहिली इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप बैठक सोमवारपासून पुण्यात सुरू होत आहे. शहरांना आर्थिक विकासाचे केंद्र बनवणे, शहराला वित्तपुरवठा करण्याच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करणे, पायाभूत सुविधा भक्कम करणे अशा विषयांवर चर्चा होणार आहे. त्याशिवाय पर्यावरणदृष्ट्या टिकाऊ पायाभूत सुविधा, सामाजिक असंतुलन कमी करणे, खाजगी वित्तपुरवठा वाढवणे या विषयांवर बैठकीत भर दिला जाईल.
इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप बैठक : भारताच्या जी-20 अध्यक्षतेचा एक भाग म्हणून आयोजित केलेली इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप बैठक 16-17 जानेवारी रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. 2023 इन्फ्रास्ट्रक्चर अजेंडावर चर्चा करण्यासाठी भारताने आमंत्रित केलेले मंच सदस्य, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था दोन दिवस एकत्र येतील. जी-20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप इन्फ्रा गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर चर्चा करतात. ज्यात इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप एक मालमत्ता वर्ग म्हणून विकसित करणे. दर्जेदार पायाभूत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, पायाभूत गुंतवणुकीसाठी आर्थिक संसाधने शोधने, नाविन्यपूर्ण साधनांची ओळख करणे अशा विशयांवर चर्चा होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत विधानानुसार, IWG चे परिणाम जी-20 फायनान्स ट्रॅकच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट होतात. पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देतात.
शहरांना वित्तपुरवठा करणे: सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत" हे या बैठकीत चर्चेचे प्रमुख प्राधान्य आहे. शिवाय, तंत्रज्ञान क्षेत्रातील जी-20 अध्यक्षपदासाठी भारताचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तंत्रज्ञान आणि नवोन्मेषांवर भर देणारा देश या नात्याने, डिजिटल डिव्हाईड कमी करण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. जी-20 साठी भारताचे मुख्य समन्वयक हर्ष श्रृंगला यांनी यापूर्वी सांगितले होते की, विकासासाठी डेटाचे तत्त्व हे जगातील विकसित आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या समूहाच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या एकूण थीमचा अविभाज्य भाग आहे. रविवारी, अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे संयुक्त सचिव सोलोमन अरोकियाराज यांनी सांगितले की, जी-20 प्रतिनिधी बैठकीसाठी आधीच पुण्यात आले आहेत. "जी-20 ची पहिली पायाभूत सुविधा कार्यगटाची बैठक पुण्यात होणार आहे. आज आधीच आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत करणार आहेत. सोमवारी आणि मंगळवारी म्हणजे 16,17 जानेवारी रोजी जी-20ची अधिकृत बैठक होईल. 20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप,” आरोकियाराज यांनी रविवारी जी-20 च्या पहिल्या इन्फ्रा वर्किंग ग्रुपच्या बैठकीत मीडिया ब्रीफिंग दरम्यान सांगितले.
पायाभूत सुविधांवर चर्चा :अरोकियाराज म्हणाले की, पायाभूत सुविधा कार्य गट पायाभूत सुविधा क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर, आव्हाने, वित्तपुरवठा पर्याय आणि विविध मानकीकरणे आणि निर्देशकांवर चर्चा करतो. " वेगवेगळ्या अध्यक्षांच्या काळात, वेगवेगळ्या थीम निवडल्या गेल्या आहेत" ते म्हणाले. जी-20 मध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका आणि युरोपियन देशांचा समावेश आहे.
हेही वाचा :BJP National Executive Meeting : पंतप्रधान मोदींचा आज रोड शो; भाजपची दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक