बरेली - नवीन धर्मांतरण अध्यादेशांतर्गत पहिला गुन्हा नोंदवल्यानंतर तीन दिवसांनी उत्तर प्रदेशातील बरेली पोलिसांनी या कायद्यांतर्गत पहिली अटक केली.
'जबरदस्तीने' झालेल्या धर्मांतराविरूद्ध अध्यादेश आणल्यानंतर काही तासानंतर ओवैश अहमद (वय 22) याच्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
बरेली जिल्ह्यातील देवरानिया भागात एका 20 वर्षीय विवाहित महिलेला 'अपहरण करण्याची धमकी' आणि 'धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली' अहमदवर उत्तर प्रदेश कायद्याविरुद्ध धर्म परिवर्तन प्रतिबंध अध्यादेश- 2020 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी बराच काळ लपला होता. 'त्याला गोळ्या घातल्या जाण्याची भीती होती,' असे त्याने म्हटले आहे.
'आपल्याला गोळ्या जातील, हा कदाचित त्याचा समज असू शकेल. परंतु, असे कोणतेच आदेश नसल्यामुळे पोलिसांनी असे करण्याचा कधीही विचार केला नव्हता," असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) संसारसिंग म्हणाले.
'आम्ही फक्त त्याचा शोध घेत होतो आणि त्यासाठी अनेक पथके शेजारच्या जिल्ह्यातही तैनात करण्यात आली होती. बुधवारी त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. त्यांनी त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. आम्ही आता तक्रारदार, साक्षीदारांची जबाब नोंदवून घेऊ आणि या प्रकरणातील तपास पूर्ण करू,' असे ते पुढे म्हणाले.