सिरसा (हरीयाणा)-नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. एकीकडे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे गहू आणि मोहरीच्या पिकही कापणीला आले आहे. त्यामुळे हरियाणा सरकारने १ एप्रिलपासून गहू आणि मोहरीची खरेदीला सुरुवात करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. मात्र, सरकाराने निर्माण केलेल्या नव्या नियमानुसार कापणीच्या वेळी यंत्रातून जे तुकडे पडतात त्यांची किंमत प्रतिक्विटल ४ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात रोष निर्माण झाला आहे.
अन्यथा पिकांनी भरलेले ट्रॅक्टर अधिकाऱ्यांच्या दालनासमोर रिकामे करू अन्यथा धरणे आंदोलन
तर दुसरीकडे पिकाच्या ओलाव्याचा दरही १४ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यामध्ये रोष निर्माण झाला आहे. परिणाणी शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे पत्र लिहित सिरसा सचिवालयात सादर केले आहे. तसेच सरकार अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्रास देण बंद करावे अशी विनंती शेतकऱ्यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारला केली आहे. जर पहिल्यासारखी शेतकऱ्यांची पीक खरेदी झाली नाही तर पीकांनी भरलेले ट्रॅक्टर संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनासमोर रिकामे करण्यात येतील आणि धरणे आंदोलन करण्यात येईल. अशा प्रकरची धमकीही शेतकऱ्यांनी दिली आह
सविस्तर वाचा- मराठा आरक्षण : अजून किती पिढ्या आरक्षण सुरू राहणार, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल