लखीमपूर खेरीउत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात युनायटेड किसान मोर्चाच्या बॅनरखाली केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची बडतर्फी sacking of Union Minister Ajay Mishra Teni , ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी यासह सर्व मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा 75 तासांचा संप सुरू झाला 75 hour dharna in Lakhimpur Kheri आहे. मोदी सरकार एमएसपी कायदा करण्याच्या बाबतीत दिलेले आश्वासन डावलत आहे, असे धरणे आंदोलनात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी Farmers Protest सांगितले. त्याचवेळी लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांवर थार गाडी चढवल्याची संतापजनक घटना घडल्यानंतरही केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी आपल्या खुर्चीत कायम आहेत. सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. यावरून सरकार शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे हे दिसून येते, असे त्या म्हणाल्या.
किसान मोर्चाच्या बॅनरखाली शेतकरी नेते राकेश टिकैत farmer leader Rakesh Tikait , पंजाबचे जोगिंदर सिंग उग्रहा, डॉ.दर्शनपाल, मेधा पाटेकर, योगेंद्र यादव आदी लखीमपूर जिल्ह्यातील बाजार समितीत पोहोचले आहेत. मेधा पाटकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, केंद्रातील मोदी सरकार आपल्या आश्वासनांपासून दूर जात आहे.