मुंबई - आज जागतिक शेअर बाजारात मंदी दिसून येत आहे, तर सराफा बाजारातही सुरुवातीच्या सत्रात फारशी गती दिसलेली नाही. तर चांदीच्या दरातही घसरण होत आहे. डॉलरच्या किमतीच्या वाढीचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर होत आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.48 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स 0.11 टक्क्यांनी घसरून आज 22 कॅरेट सोन्याचे दर 47,804 प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीच्या दरातही किंचित घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 62,680 रूपयांवर व्यवहार करत आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 52,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.
- तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर
शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 47,713 | 62,560 |
पुणे | 47,713 | 62,560 |
नाशिक | 47,713 | 62,560 |
नागपूर | 47,713 | 62,560 |
दिल्ली | 47,630 | 62,450 |
कोलकाता | 47,648 | 62,480 |