महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gold Silver Price Today : खुशखबर सोन्याच्या भावात घसरण, ग्राहकांना मिळणार मोठा फायदा

आज सोन्याच्या दरात घसरण ( Fall in gold prices ) झाली आहे. आजच्या सोन्या-चांदीच्या किमतींबद्दल सांगणार आहोत. BankBazaar.com नुसार, आज 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 4 हजार 628 रुपये आहे. तर काल हा भाव 4 हजार 678 होता, म्हणजेच सोन्याचा भाव 50 रुपयांनी खाली आला आहे.

Gold Silver Price Today
सोन्याच्या भावात घसरण

By

Published : Sep 28, 2022, 9:37 AM IST

मुंबई : आज सोन्याच्या दरात घसरण ( Fall in gold prices ) झाली आहे. जर तुम्ही आज सोने, चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आजच्या सोन्या-चांदीच्या किमतींबद्दल सांगणार आहोत. BankBazaar.com नुसार, आज 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 4 हजार 628 रुपये आहे. तर काल हा भाव 4 हजार 678 होता, म्हणजेच सोन्याचा भाव 50 रुपयांनी खाली आला आहे. त्याचप्रमाणे इतर कॅरेटही बदलले आहेत.

24 कॅरेट सोन्याच्या भावातही घट -सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचा 8 ग्रॅमचा भाव 37 हजार 024 रुपये आहे, तर काल 37 हजार 424 होता, म्हणजेच सोन्याच्या दरात 400 रुपयांनी घट झाली आहे. तर, 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 4 हजार 859 रुपये आहे, तर कालचा भाव 4 हजार 859 रुपये होता, म्हणजेच 53 रुपयांनी दरात कमी झाली आहे. याशिवाय, 8 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 38 हजार 872 रुपये आहे, तर कालची किंमत 39 हजार 296 रुपये होती, म्हणजेच या किमती 424 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.

चांदीचे भाव स्थिर-आजच्या चांदीच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, आज चांदीचा भाव स्थिर ( Silver price today ) आहे. एक किलो चांदीची किंमत आज 60 हजार 700 रुपये आहे. कालही हीच किंमत चांदीची होती. त्यामुळे चांदीच्या भावात कोणतीही दरवाढ झालेली नाही.

22, 24 कॅरेट सोन्यामधील फरक -24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध असते. तर, 22 कॅरेट सोने सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी, 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details