नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला आंध्रप्रदेशात आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एक दिवसापूर्वी माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
संयुक्त आंध्रचे शेवटचे मुख्यमंत्री:शुक्रवारी भाजप नेते आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांना भाजपचे सदस्यत्व मिळवून दिले. रेड्डी यांनी १२ मार्च रोजीच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर रेड्डी भाजपात प्रवेश करणार आहेत अशी चर्चा होती. संयुक्त राज्य आंध्र प्रदेशचे किरण कुमार रेड्डी हे शेवटचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळानंतर राज्याचे विभाजन होऊन तेलंगणाच्या रूपाने नवीन राज्याचा जन्म झाला होता.
आता तुम्हाला समजेल:किरण रेड्डी म्हणाले की, मी काँग्रेस सोडेन असे कधीच वाटले नव्हते, पण त्यांना पक्ष सोडावा लागला. एका म्हणीचा संदर्भ देत ते म्हणाले, 'माझा राजा खूप हुशार आहे, तो स्वत:चा विचार करत नाही. आणि तो कोणाचाही सल्ला ऐकत नाही. रेड्डी म्हणाले की, आम्हाला काय म्हणायचे आहे ते आता तुम्हाला समजले असेल.