चंदीगड - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, त्यांचे सरकार राज्यातील जनतेला दिलेली हमी पूर्ण करत आहे, ज्या अंतर्गत शुक्रवारपासून प्रत्येक घराला 300 युनिट वीज मोफत दिली जाईल. ( Every Household In Punjab Will Get 300 Units Electricity ) आम आदमी पक्षाच्या सरकारने यापूर्वी 1 जुलैपासून प्रत्येक घरात 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती.
प्रत्येक घरात प्रत्येक महिन्याला 300 युनिट - मान यांनी ट्विट केले की, 'पूर्वीची सरकारे निवडणुकीच्या वेळी आश्वासने देत असत. आश्वासनांच्या पूर्ततेसाठी पाच वर्षे निघून जायची, पण आमच्या सरकारने पंजाबच्या इतिहासात नवा आदर्श घालून दिला आहे. आज आपण पंजाबींना दिलेले आणखी एक वचन पूर्ण करणार आहोत. आजपासून पंजाबमधील प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. (2022)च्या पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान (AAP)ने दिलेल्या आश्वासनांपैकी एक म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज पुरवणे.