महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - todays news

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

टॉप न्यूज
टॉप न्यूज

By

Published : Nov 17, 2021, 5:55 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस


शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिवस आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक तसेच नागरिक मुंबईतील त्यांच्या स्मृती स्थळावर दाखल होत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसली तरी ते अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • आजपासून तीन T-20 मालिकेला सुरूवात

उभय संघांमधील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. यानंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये (IND vs NZ) दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये किवी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

  • सुप्रीम कोर्टात दिल्ली प्रदूषणावर होणार सुनावणी

राजधानी दिल्लीतल्या प्रदूषणावरुन सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारला फटकारलं आहे. दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो, पण तरी उपाय योजना होत नसल्यानं कोर्टानं खंत व्यक्त केली. तसंच केंद्र सरकारला दिल्लीसह सर्व संबंधित राज्यांची एक तातडीची बैठक घेण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. आज या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

  • विविध मागण्यासाठी आजपासून स्वाभिमानीचे एल्गार

कापसासह सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा या मागणीसाठी आजपासून नागपुरातून एल्गार पुकारला जाणार आहे.

  • राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

हिवाळा सुरू झाला असला तरी आता राज्यातून थंडी गायब झाली असून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेचा कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं. त्यामुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

मुंबई -महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची सरबत्ती लावली होती. मात्र, आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका (allegations between bjp and mahavikas aghadi ) ड्रग्स माफियाशी असलेला संबंधापासून, दंगलीशी असलेल्या संबंधापर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते आहे.सविस्तर वाचा...

मुंबई -महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात हजारो कोटींची लूट सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांच्या वाटेला काहीच येत नाही, अशा शब्दात फडणवीसांनी सरकारबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत झाली. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेते, पदाधिकारी उपस्थित होते.सविस्तर वाचा...

ठाणे - 'आम्ही जीव घेत नाही तर जीव वाचवतो' असे म्हणत ठाण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोमध्ये एका रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी गेले अनेक दिवस काम बंद आंदोलन करत आहेत. मात्र, या अनोख्या पद्धतीने रक्तदान करून एसटी कर्मचाऱ्यांनी एक सामाजिक पायंडा घातला आहे.सविस्तर वाचा...

मुंबई -एनसीबीचे (ncb) विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त (mumbai police commissioner) हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये सुमारे 35 मिनिटे बैठक झाले समीर वानखेडे यांना जात वैधता प्रमाणपत्राशी संबंधित चौकशीसंदर्भात बोलावण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.सविस्तर वाचा...

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड उडली आहे. शिवसेनेना यावरुन आक्रमक झाली असून राज्यभर सह्यांची मोहिम राबवत आहेत. आज (मंगळवारी) शिवडी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेने तीव्र निषेध नोंदवला. दरम्यान, कंगनाचे डोके फिरले असून, देशाच्या स्वातंत्र्याचा तिने घोर अपमान केला आहे. पंतप्रधानांनी तिचा पद्मश्री किताब काढून घ्यावा, राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली तिला अटक करावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, कंगना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.सविस्तर वाचा...

सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट रोडवरील (Solapur Akkalkot road) कुलकर्णी पेट्रोल पंपासमोर एक क्रुजर गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालयात (Solapur Hospital) उपचार केले जात आहेत.सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ABOUT THE AUTHOR

...view details