महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आज होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक ; वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - आज होणाऱ्या बातम्या

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

1 september top news
1 september top news

By

Published : Sep 1, 2021, 6:07 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार असून अनिल परब ईडी प्रकरण, कोरोना सारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यत आहे.
  • आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंचगंगा परिक्रमा यात्रा
  • आजपासून ईपीएफ, धनादेश वटविणे, बचत खात्यावर व्याज, एलपीजी सिलिंडर, कार ड्रायव्हिंग आणि ओटीटी प्लॅटफॉर्मशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहे.
  • आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

  • मुंबई - सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे, ओबीसीचे आरक्षण नियमित होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणूक घेण्यात येऊ नये, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. सविस्तर वाचा...
  • मुंबई -राज्यातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता अजूनही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास सरकारने मनाई केली आहे. तसेच केंद्र सरकारने राज्य सरकारला भविष्यातील परिस्थिती पाहता याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. तर तेच दुसरीकडे सरकारने सणांना परवानगी न दिल्यामुळे विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. सरकारने दहीहंडीचा सण साजरा करायला परवानगी दिलेली नसतानाही भाजप आणि मनसेने दहीहंडी फोडत हा सण साजरा करण्याची भूमिका घेतली. राज्याच्या राजकारणात सण साजरा करण्यावरुन पुन्हा एकदा सरकार आणि विरोधक असा एक संघर्ष पाहायला मिळत आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज मंगळवारी (३१ ऑगस्ट)रोजी ४१९६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातून आज ४,६८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. सविस्तर वाचा...
  • नवी दिल्ली - कोरोनाच्या काळात घसरलेल्या अर्थव्यस्थेसाठी दिलासादायक बातमी आहे. देशाच्या सकल उत्पादनात (जीडीपी) चालू वर्षाच्या एप्रिल ते जूनच्या तिमाहीत 20.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील तिमाहीत जीडीपीत 24.4 टक्क्यांची घसरण झाली होती. जीडीपीची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. सविस्तर वाता....
  • ठाणे -शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणेकर नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडले. 'दहीहंडीचा सण साजरा न करता तसेच त्यावर वायफळ खर्च न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली आहे. हंडीवर खर्च न करता आरोग्य उत्सव साजरा करून ऑक्सिजन प्लांट उभारले असून जनतेची सरनाईक यांनी काळजी घेतली आहे. अशा जनहिताच्या कामातून जनतेचे खरे आशीर्वाद मिळतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.सविस्तर वाचा....

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ABOUT THE AUTHOR

...view details