महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण...वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

टॉप न्यूज
टॉप न्यूज

By

Published : Aug 28, 2021, 5:44 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे लोकार्पण आज ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.
  • केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची जन आशीर्वाद आज संपन्न होणार आहे.
  • सलगच्या सुट्ट्यामुळे पुढील चार दिवसा बँका बंद असणार आहे.
  • राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत आज गोंदिया दौऱ्यावर असणार आहे.
  • आजपासून पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
  • कृषी विभागाच्यावतीने मुंबईत प्रथमच मुलुंड येथे रानभाज्या व कृषी माल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • आज अहमदनगर जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद असणार आहे.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

नवी दिल्ली - तुम्ही बँकांमध्ये नियमितपणे आर्थिक व्यवहार करत असताल तर ही महत्त्वाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्यात बँकांना एकूण 12 सुट्टी असणार आहेत. सणांमध्ये गणेश चतुर्थी, हरितालिका, श्री नारायण गुरू समाधी दिन, कर्म पुजा आदींचा समावेश आहे.सविस्तर वाचा...

पुणे - पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील नेतेमंडळी तसेच विरोधी पक्षनेते आणि सर्वच गटनेते यांची बैठक पार पडली. याबैठकीत जोपर्यंत ओबीसीवर झालेला अन्याय दूर होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नये, असे सर्वच मत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.सविस्तर वाचा...

जळगाव -कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेला जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याकडे पाहिले जात होते. कोरोना संसर्गाचा वेग आणि मृत्यूदर यामुळे जिल्हा राज्यच नव्हे तर देशाच्या नकाशावर झळकला होता. पण आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे आज जळगाव जिल्ह्यात काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला असून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सव्वा महिन्याच्या काळात जिल्ह्यात कोरोनामुळे एकही बळी गेलेला नाही. कोरोनाचा उद्रेक अनुभवणाऱ्या जळगाववासीयांना हा खऱ्या अर्थाने दिलासा मानला जात आहे.सविस्तर वाचा...

सांगली - पोलीस आणि गावगुंडांच्या जोरावर हे सरकार चालत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघा़डी सरकारवर केली आहे. तसेच 'अटॅक इज बेस्ट डिफेन्स' त्यामुळे अंगावर गेल्याशिवाय काही होणार नाही, असा कानमंत्र चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. सांगलीतील भाजप जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.सविस्तर वाचा...

टोकियो - पहिल्यांदाच भारताची टेबल टेनिस खेळाडू टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये उपांत्यफेरीत पोहोचली आहे. भाविना पटेल असे महिला टेबल टेनिसमध्ये इतिहास रचणाऱ्या खेळाडूचे नाव आहे. 34 वर्षीय भाविना ही अहमदाबादची खेळाडू आहे.सविस्तर वाचा...

मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकरणीत पहिल्यांदाच दोन तृतीयपंथीयांना स्थान देण्यात आले आहे. सलमा खान साकेरेकर आणि पार्वती जोगी यांची काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. या वर्गासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना संधी देत सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न काँग्रेसने केल्याचे दिसून येत आहे.सविस्तर वाचा...

पुणे - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे नाव पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला देण्यात आले आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या मैदानाचे आज (शुक्रवार) नामकरण करण्यात आले. याच मैदानावर नीरज चोप्राने कठोर परिश्रम करत मोठे यश संपादन केले. त्याच्या यशाचा गौरव म्हणून आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या या मैदानाला त्याचे नाव देण्यात आले. यावेळी लष्कर प्रमुख मनोज नरवणे हेदेखील उपस्थित होते.सविस्तर वाचा...

पंढरपूर -पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमध्ये कोरोना साखळी तोडण्यासाठी तालुका प्रशासनाकडून 14 दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. पंढरपूर शहरात डेंग्यू व चिकुनगुनीया सदृश्य संसर्ग रोगाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. शहरात दोन महिन्यांत 2767 घरांमध्ये डेंग्यू व चिकुनगुनीया सदृश्य अशा अळ्या आढळून आल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषदेचे जीवशास्त्र अधिकारी किरण मंजुळे यांनी दिली आहे.सविस्तर वाचा...

मुंबई - छोट्या पडद्यावरचा अभिनेता गौरव दीक्षित याला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीने गौरव दीक्षित यांच्या घरी धाड टाकली. यावेळी गौरवच्या घरातून एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच चरस आणि अन्य अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले आहेत.सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

28 ऑगस्ट राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज पत्नीकडून चांगली बातमी मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी

ABOUT THE AUTHOR

...view details