आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आज ते लखनौमध्ये दाखल होतील.
- केंद्र सरकारकडून अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होणार आहे.
- राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
- आज संपूर्ण विदर्भात स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भवाद्यांकडून रस्ता रोको आंदोलन होणार आहे.
- आज पिंपरी चिंचवडमध्ये फक्त कोव्हॅक्सिनचे डोस या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार आहे.
- महाराष्ट्रातील काही भागात आज हलका व मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
- मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी हिचा आज वाढदिवस.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
मुंबई :ज्यांना देशाचा स्वातंत्र्यदिनाविषयी माहिती नाही, त्यांनी चेष्टा करावी हे सहन न झाल्यानेच माझ्या तोंडून ते वाक्य आले असे म्हणत नारायण राणेंनी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्वतःच्या विधानाचे समर्थन केले. यावेळी बोलताना पुढचं वाक्य नेक्स्ट टाईम असे म्हणत मी माझी बाजू मांडली असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांसमोर दिले. मी जेवढं सांगितलं त्यापैकी तुम्हाला लोकांपर्यंत जेवढं पोहोचवता येईल तेवढं पोहोचवा, मी केलं ते राष्ट्रीयत्व असेही ते पत्रकारांना म्हणाले.सविस्तर वाचा...
मुंबई - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 6 लाख कोटींच्या मालमत्ता रोखीकरण (monetisation) योजनेवर टीका केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींना असे निर्णय समजतात का, असा टोला सीतारामन यांनी लगाविला. सत्तेत असताना काँग्रेसने खाणी आणि जमिनी विकल्याचा दावाही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला. त्या माध्यमांशी बोलत होत्या.सविस्तर वाचा...
नवी दिल्ली- खासदार आणि आमदारांविरोधातील प्रकरणात ईडी आणि सीबीआयकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणे आहेत. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयातील पीठाचे मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार-खासदारांच्या विरोधातील तपास प्रकरणात दिरंगाई होण्यामागे कारणही तपास संस्थांनी दिले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे.सविस्तर वाचा...
नाशिक- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगूल वाजला असून राज्यातील मुंबईसह १८ महापालिकांच्या निवडणुका वॉर्ड पद्धतीने होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.सविस्तर वाचा...