- आज दिवसभरात/आजपासून -
सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची आज मुख्यमंत्री करणार पाहणी
सांगली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुराचा फटका कोल्हापूर, सांगली, सातारा या भागाला बसला आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. आज (2 ऑगस्ट) मुख्यमंत्री सांगलीतील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. अद्याप राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे सांगली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची आज मुख्यमंत्री करणार पाहणी; मदतीच्या घोषणेकडे लक्ष
राज कुंद्राच्या जामिन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई : बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लिल व्हिडिओ बनवणे आणि ते इंटरनेटवर अपलोड केल्या प्रकरणी अटक झाली आहे. राजला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतु राजची अटक बेकायदा असल्याचे सांगत त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज टास्क फोर्स टीमसोबत बैठक
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज टास्क फोर्स टीमसोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
छत्तीसगडमध्ये आजपासून 10 वी आणि 12 वी चे वर्ग होणार सुरू
छत्तीसगड- राज्यात आजपासून 10 वी आणि 12 वी चे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. त्या आता टप्प्यााटप्प्याने उघडत आहेत.
- कालच्या टॉप न्यूज -
..अन्यथा 15 ऑगस्टपासून MPSC च्या विद्यार्थ्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन - सदाभाऊ खोत
सांगली -15 ऑगस्टपर्यंत MPSC च्या परीक्षा जाहीर करा, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत, अशांना नियुक्ती पत्र द्या आणि आयोगावरील सदस्य नेमा, अन्यथा महाविकास आघाडी सरकारविरोधात राज्यातील MPSC विद्यार्थ्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. ते इस्लामपूरमध्ये बोलत होते.
..अन्यथा 15 ऑगस्टपासून MPSC च्या विद्यार्थ्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन - सदाभाऊ खोत
सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची आज मुख्यमंत्री करणार पाहणी; मदतीच्या घोषणेकडे लक्ष
सांगली -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुराचा फटका कोल्हापूर, सांगली, सातारा या भागाला बसला आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. आज (2 ऑगस्ट) मुख्यमंत्री सांगलीतील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.