महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Nivedita Sooraj Funeral: ईटीव्ही भारतच्या पत्रकार निवेदिता सूरज यांच्यावर अंत्यसंस्कार.. भावपूर्ण वातावरणात दिला निरोप - निवेदिता सूरज यांचा अपघातात मृत्यू

Nivedita Sooraj Funeral: हैदराबादमधील हयातनगर परिसरात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ईटीव्ही भारतच्या पत्रकार निवेदिता सूरज ETV Bharat Journalist Nivedita Sooraj यांच्यावर केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातल्या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. Nivedita Sooraj remembered funeral rites took place

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 20, 2022, 1:24 PM IST

त्रिशूर (केरळ) : Nivedita Sooraj Funeral: हैदराबादमध्ये कार अपघातात मृत पावलेल्या ईटीव्ही भारत केरळ डेस्क कंटेंट एडिटर निवेदिता सूरज (२६) ETV Bharat Journalist Nivedita Sooraj यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी 10:30 वाजता, इरिंगलाकुडा त्रिशूर जिल्ह्यातील तिच्या विरुथीपारंबिल निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात आले.

बंधू शिवप्रसाद यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला. अंत्यसंस्काराला नातेवाईक, मित्र आणि सहकारी उपस्थित होते. ईटीव्ही भारतच्या वतीने केरळचे राज्य प्रमुख के प्रवीण कुमार आणि केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टच्या वतीने राज्य अध्यक्ष एमव्ही विनीथा यांनी त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. Nivedita Sooraj remembered funeral rites took place

ईटीव्ही भारतच्या पत्रकार निवेदिता सूरज यांच्यावर अंत्यसंस्कार..

निवेदिता सूरज यांचा काल (दि. १९) सकाळी हैदराबादजवळील हयातनगर येथे कार अपघातात मृत्यू झाला. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निवेदिता आपल्या राहत्या घरातून ऑफिसला जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना एलबी नगरच्या बाजूने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. निवेदिता सूरज यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक तात्काळ फरार झाला. धडक बसल्याने कार दुभाजकाला धडकली आणि विरुद्ध दिशेने जाऊन पडली. पोलिसांनी कार ताब्यात घेतली. हयातनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

निवेदिता ही त्रिशूर जिल्ह्यातील पडियूर येथे राहणारे सूरज आणि बिंदू यांची मुलगी आहे. शिवप्रसाद तिचा भाऊ आहे. तो पदवीधर विद्यार्थी आहे. मे 2021 रोजी, निवेदिता ETV Bharat मध्ये कंटेन्ट एडिटर म्हणून सामील झाल्या. निवेदिताने रिपोर्टर टीव्हीच्या त्रिशूर ब्युरोमध्येही काम केले.

ABOUT THE AUTHOR

...view details