महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ईएसआय योजना या वर्षाच्या अखेरीस होणार संपूर्ण देशात लागू - ESI scheme will be implemented across the country this year

कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की या वर्षाच्या अखेरीस अंशतः ईएसआय योजनेत समाविष्ट असलेले आणि अद्याप त्यात समाविष्ट न झालेले सर्व जिल्हे या योजनेच्या कक्षेत आणले जातील. नवीन दवाखान्यासह शाखा कार्यालये (DCBOs) स्थापन करून आरोग्य सुविधा सेवा उपलब्ध करून दिल्या जातील, असे निवेदनात म्हटले आहे.

ईएसआय योजना या वर्षाच्या अखेरीस होणार संपूर्ण देशात लागू
ईएसआय योजना या वर्षाच्या अखेरीस होणार संपूर्ण देशात लागू

By

Published : Jun 20, 2022, 9:41 AM IST

नवी दिल्ली: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने 2022 च्या अखेरीस देशभरात आरोग्य विमा योजना ESI लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कर्मचारी राज्य विमा (ESI) योजना 443 जिल्ह्यांमध्ये पूर्णत: आणि 153 जिल्ह्यांमध्ये अंशतः लागू आहे. एकूण 148 जिल्हे ESI योजनेच्या कक्षेत नाहीत. कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या ESIC च्या 188 व्या बैठकीत देशभरात वैद्यकीय सुविधा आणि सेवा पुरवठा प्रणालीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत या वर्षाच्या अखेरीस संपूर्ण देशात ईएसआय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की या वर्षाच्या अखेरीस अंशतः ईएसआय योजनेत समाविष्ट असलेले आणि अद्याप त्यात समाविष्ट न झालेले सर्व जिल्हे या योजनेच्या कक्षेत आणले जातील. नवीन दवाखाना सह शाखा कार्यालये (DCBOs) स्थापन करून आरोग्य सुविधा सेवा उपलब्ध करून दिल्या जातील, असे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय ESIC ने देशभरात 23 नवीन 100 खाटांची रुग्णालये उघडण्याचा निर्णय घेतला आहे.


त्यापैकी महाराष्ट्रात सहा, हरियाणामध्ये चार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात प्रत्येकी दोन रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्णालय सुरू केले जाईल. याशिवाय विविध ठिकाणी दवाखानेही सुरू करण्यात येणार आहेत. निवेदनात म्हटले आहे की, ही रुग्णालये आणि दवाखाने विमाधारक कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देऊ शकतील.

हेही वाचा - अग्निपथ' या नवीन योजनेबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 35 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बंदी

ABOUT THE AUTHOR

...view details