श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात आज (मंगळवारी) झालेल्या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा रक्षकांशी झालेल्या या चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवाद्याची ओळख पटली असून मुख्तार शाह, असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये एका फेरीवाल्याची हत्या केल्यानंतर तो शोपियानमध्ये फरार झाला होता.
सोमवारी संध्याकाळी लष्कराच्या संयुक्त मोहिमेत ही चकमक सुरु झाली होती. सुरक्षा दलांना शोपियानच्या तुलरान इमाम साहिब गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यांनतर सुरू झालेल्या कारवाईदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करून आज सकाळी हे ऑपरेशन संपवण्यात आले. मृत्यू झालेले तीनही दहशतवादी हे विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याने सुरक्षा दला साठी ही मोठी उपलब्धी आहे.
हेही वाचा - राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर इंडियाला केंद्राचा हिरवा कंदील; २०२२ मध्ये सुरू करणार वाहतूक