श्रीनगर ( जम्मू काश्मीर ) - उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर पानीपोरा जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एलईटीचा एका दहशतवादीला कंठस्नान घातले आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
Jammu & Kashmir : सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान - बारामुल्ला
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर पानीपोरा जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एलईटीचा एका दहशतवादीला कंठस्नान घातले आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
एका पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांना सोमवारी ( दि. 6 जून ) संध्याकाळी सोपोरच्या पानीपोरा जंगल परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला. ताज्या माहितीनुसार या चकमकीत लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एक विदेशी दहशतवादी मारला गेला. अतिरेक्याकडून दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत एक स्थानिक आणि दोन विदेशी दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात शोधमोहीम सुरू आहे.